पैठण प्रतिनिधी
कवयित्री आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा सोलनापूर यांनी मनीषा बहिर/घेवडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्या सध्या मुंबई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. पैठण येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन संपन्न झाले यामध्ये द्वितीय सत्र परिसंवादामध्ये देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्या बोलताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांची जडणघडण ही लहान वयापासूनच होत असते. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देखील विद्यार्थ्यांना मिळणं तितकच गरजेचं आहे.
विद्यार्थी देखील चांगले वाचक व चांगले लेखक कवी झाले पाहिजे त्याकरिता कवयित्री-कवी आपल्या भेटीला अशा प्रकारचे उपक्रम सर्व शाळांनी राबवले पाहिजे असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी बालकविता सादर केल्या त्यातून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष के.बी शेख, शालेय समिती सदस्य दीपक मिसाळ, सुरेश सातपुते, ज्ञानेश्वर खराद जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, संतोष भराट, भगवान येळे, कैलास वाकडे, ज्योती मुळे, विद्या आंधळे, रेश्मा देवडे, मुख्याध्यापिका छाया रोडे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याकरिता शिक्षक व पालक यांनी एकत्र आले पाहिजे. शाळेमध्ये बऱ्याच भौतिक सुविधांची कमतरता आहे शासनाचा आलेल्या निधी पुरेसा होत नाही. पालकांनी यामध्ये आर्थिक सहकार्य करून शाळेला समृद्ध करण्यासाठी पुढे यावे.
के.बी शेख..(शालेय समिती अध्यक्ष सोलनापूर)