January 7, 2025 8:59 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » स्नेहालय नगर एफएम ने घेतली दखल,शिंदे दांपत्याची घेतली मुलाखत

स्नेहालय नगर एफएम ने घेतली दखल,शिंदे दांपत्याची घेतली मुलाखत

Facebook
Twitter
WhatsApp

अहिल्यानगर(प्रतिनीधी)
प्रमोद मिसाळ
शेवगाव येथील शिंदे दांपत्य हे अनेक वर्षापासुन समाजसेवेचे प्रमाणिक वृत घेऊन महापुरुषांच्या विचारधारेवर काम करत आहेत “शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच” ह्या सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन त्यांनी शेवगावासह अ.जिल्ह्यात आपल्या समाज कार्याचा ठसा उमटवला आहे जसे की महामानवाच्या जयंत्या सामाजिक उपक्रमाने साज-या करणे, भारताचे संविधानाचे जवळपास 3500प्रति शाळा ,कॉलेज,मदरसा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे करणारे, मध्ये मोफत वाटप करणे,शालेय साहीत्य वाटप करणे,नुकतेच त्यांनी उसतोड कामगारांच्या मुलांसाठी भगवान बाबा ऊस तोडणी कामगार मुलांचे व मुलींचे वस्तीगृह उभारण्याची शासनाकडे मागणी केली असता ह्या मागणीची शासनाने दखल घेतली असुन कारवाहीस्तव शासन प्रयत्नशिल आहे.तसेच पुण्याचा ऐतीहासीक भिडेवाड्याचा जिर्णोद्दार करा व लोकांसाठी आदराचे ऐतिहासिक स्थळ म्हणुन घोषीत करा ह्या मागणिची शासनाने दखल घेतली आहे.ज्या महिलांचा लग्नानंतर शिक्षणात खंड पडुन शिक्षण बंद झाले होते अशा अनेक महिला,युवतींना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणुन शिक्षण चालु केले त्याचप्रमाणे महिला बालविवाह प्रतिबंधक कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचे लवकरच पाठपुरावा करणार आहेत .ह्या समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन सौ.ऊषा अशोक शिंदे यांनी सावित्रीची लेक पुरस्कार हा नवी दिल्ली येथे मिळाला आहे.ह्याच समाजकार्याची महती दुरवर पोहचुन नुकतेच स्नेहालय एफएम नगर च्या वतीने शिंदे दांपत्याची मुलाखात घेऊन त्यांना मा. भूषण देशमुख सर आदरणीय दिग्दर्शक यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व आपल्या प्रभावी वाणीने व प्रगल्भ अनुभावाच्या जोरावर
मुलाकात घेऊन त्यांच्याच शुभहस्ते सन्मानपत्र देण्यात आले त्यांचे सर्वत्र सर्व स्तरावरून शिंदे दांपत्यांचे अभिनंदन होत आहे

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें