( आमदार मोनिकाताई राजळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी)
अहिल्यानगर प्रतिनिधी:अविनाश बूटे🖋️
शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये कौशल्य विकास विभागांतर्गत सहा महिने मुदतीवर राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरीता चालू केलेल्या मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षन योजनेअंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींची ऑगस्ट महिन्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, या प्रशिक्षणार्थींना आहे त्याच अस्थापनांकडे कायम करण्यात यावे, शासकीय व निमशासकीय नोकरदारांप्रमाणे वैद्यकीय देय रजा, तीन महिन्याची गुंतलेले वेतन देण्यासंदर्भात ,शासनाच्या नोकर भरती मध्ये दहा टक्के राखीव जागा असाव्यात आदी मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी हिवाळी अधिवेशनात केल्या.
राज्यातील सुशिक्षीत- बेरोजगारांना प्रशिक्षनार्थी म्हणुन कौशल्य विकास विभागा अंतर्गत सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षन योजने अंतर्गत शासनाच्या विवीध विभागात नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थींना आहे त्याच विभागात कायम करण्याची मागणी छत्रपती शिवराय कौशल्य विकास प्रशिक्षनार्थी संघटनेच्या वतीने सातत्याने केली जात आहे. याच विषयी संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
प्रतिक्रिया
मनुष्यबळाच्या २०%, इतर उद्योग असलेल्या क्षेत्रामध्ये १०% तसेच सरकारी आस्थपनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या मंजूर पदांच्या ५% मनुष्यबळ इंटर्न म्हणून नियुक्त करता येण्याची अट शिंदे सरकारने केली होती तर नोंदणी केल्यानंतर युवकांचे बायोडेटा संबंधित आस्थापनांमध्ये पाठवल्यानंतर मनुष्यबळाची उपलब्धता पूर्ण केली जाणार असल्याचही सरकारने सांगीतल होत त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये कौशल्य विकास विभागाअंतर्गत ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद शाळा, तलाठी , महसूल, पोलीस, सहकार, औद्योगिक अशा शासकीय व निमशासकीय विभागामध्ये सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून राज्यातील एक लाख दहा हजार तरुण-तरुणींची नियुक्ती करण्यात आली आहे , मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संपल्यानंतर ज्या विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी कार्य करत आहेत त्याच विभागामध्ये त्यांना कायम करण्यात यावं अन्यथा संपूर्ण राज्यभर अंदोलन करु.
प्रमोद मिसाळ
छत्रपती शिवराय कौशल्य विकास प्रशिक्षनार्थी संघटना