उमरखेड प्रतिनिधी:-🖋️
दिनांक 15 12 2024 रोज रविवारला जिनियस कोचिंग क्लासेस या ठिकाणी निबंध स्पर्धा घेण्यात आली .या निबंध स्पर्धेचा विषय
**पर्यावरण शिक्षण काळाची गरज*
हा ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना पर्यावरण, निसर्ग, निसर्गातील विविध घटक, वैज्ञानिक दृष्टीकोन , वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता विविध उपक्रम स्व श्रीराम भोजाजी सूर्यवंशी बहुउद्देशीय संस्थेतर्फे घेण्यात येतात, याचाच एक भाग म्हणून निबंध स्पर्धा घेण्यात आली .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री किसन सूर्यवंशी सर संस्थेचे सदस्य नानाराव खापरे ,जीनियस कोचिंग क्लासेस चे प्रमुख बोराळकर सर सव्वाशे सर उपस्थित होते.
श्री सूर्यवंशी सर यांनी संस्थेचे प्रमुख उद्देश उपक्रम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर श्री बोराळकर सर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता पर्यावरण काळाची गरज यावर विचार मांडले स्पर्धेत एकूण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
1) प्रथम क्रमांक
सिद्धी संजय पेंदे श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड
2)द्वितीय क्रमांक
संजीवनी शेकोराव पिंपळे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड
3)तृतीय क्रमांक
रिया शिवचरण आत्तेवार
श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड तर
प्रोत्साहन
वैष्णवी पंजाबराव सुरोशे म जो फुले
श्रद्धा गजानन बेद्रे गु गो विद्या मंदिर
सिद्धी सुरेश जाधव म ज्यो फुले
अक्षरा राजेश्वर जाधव साकळे विद्यालय
यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.