January 7, 2025 8:23 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » उमरखेड येथील डॉ. व्यवहारे यांचा स्तुत्य उपक्रम

उमरखेड येथील डॉ. व्यवहारे यांचा स्तुत्य उपक्रम

Facebook
Twitter
WhatsApp

[इंजिनीयर मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिओ नेट फायबरची शाळेला भेट..!]

उमरखेड प्रतिनिधी:- अत्तदीप धुळे🖋️

उमरखेड (दिनांक १६ डिसेंबर) येथील विवेकानंद वार्ड मधील रहिवासी असणारे डॉ. धनंजय व्यवहारे यांच्या पत्नीसह शहीद भगतसिंग शाळा क्रमांक २ ला भेट देऊन आपल्या इंजिनीयर मुलाच्या वाढदिवसानिमित्त शहीद भगतसिंग नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक दोन उमरखेड यांना विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी जिओ नेट फायबरची दिली भेट.

यावेळी डॉ. धनंजय व्यवहारे आणि त्यांची अर्धांगिनी यांचा शिक्षकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सिद्धार्थ दिवेकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवेकर यांचाही शिक्षक सूर्यवंशी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इंजिनीयर आदित्य धनंजय व्यवहार हे अमेरिकेमधील गुगल या कंपनीत कार्यरत असून त्यांचा वाढदिवस असल्याने आगळावेगळा रीतीने साजरा केला आहे.

आजच्या वैज्ञानिक युगा मध्ये डिजिटल शिक्षणासाठी जिओ फायबर हे अत्यंत आवश्यक झाले आहे. जिओ नेट फायबर शाळेला भेट दिल्यामुळे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड सर, डॉ.सुनील कवडे सर इत्यादी अनेक शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें