तहसीलदार किशोर यादव यांचे शेतकऱ्यांना आवाहन.
प्रतिनिधी:गोपाल नाईक
श्रीक्षेत्र माहुर : सन 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान रक्कम जमा झाली असून पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी गावोगावच्या तलाठी, पोलीस पाटील कोतवाल यांच्याकडे शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर पासबुक आधार कार्ड जमा करण्याचे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
माहूर तालुक्यातील 84 महसुली गावापैकी 34 गावातील शेतकऱ्यांची आधार कार्ड मोबाईल नंबर पासबुक अपलोड करण्याची कामे पूर्ण झाली असून 50 गावातील शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केली नसल्याने शेतकऱ्यांसाठी आलेली अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वाटपाअभावी तशीच पडून आहे सप्टेंबर 2024 च्या अतिवृष्टी अनुदानासाठी तालुक्यातील 26,172 शेतकऱ्यांसाठी अनुदान म्हणून 35 कोटी 11 लक्ष 60, हजार 208 रुपये तहसील कार्यालयाकडे जमा झाले असून यापैकी 5944 शेतकऱ्यांची परिपूर्ण नोंद घेण्यात आली असून 20288 शेतकऱ्यांची माहिती जमा होणे बाकी आहे
अनुदान वाटपाच्या मुद्दतीला जास्त वेळ नसल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी दिनांक 3 रोजी तहसील कार्यालयात आढावा बैठक बोलावून तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन येत्या तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले असून या बैठकीत तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह सर्व तलाठी पोलीस पाटील कोतवाल उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे जमा करून शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावेत असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी किशोर यादव यांनी केले आहेत