संतप्त आंबेडकरी जनतेचे शिक्षण विभागावर ताशेरे
हिमायतनगर :- (रमेश पंडित) संबंध महाराष्ट्रामध्ये परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीचे तोडफोड केल्यानंतर संबंध महाराष्ट्र पेटून उठला आणि बंद ची हाक सुद्धा देण्यात नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्रसाद उमटून दिसली परंतु हिमायतनगर तालुक्यामध्येच कुठलेही भीमसैनिकांनी बंदची हाक न दिली नाही हिमायतनगर शहर नेहमीप्रमाणे सकाळपासूनच सुरळीत सुरू होते परंतु तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा अजब कारभार पायास मिळत आहे ग्रामीण भागातल्या बहुतांश शाळा चालू असताना हिमायतनगर शहरातील नामांकित संस्था तथा खाजगी शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा कार्यक्रम या संस्थांच्या मार्फत करण्यात आल्याचे प्रकर्षाने आणि जाणवत आहे . प्रश्न असा निर्माण होतो संबंधित शाळेला बंद करण्याचे आदेश पारित कोणी केले ? संबंधित शाळेंना पालकांनीअसा प्रश्न विचारणा केल्यानंतर विद्यार्थीच आले नाहीत असे उत्तर मिळाले परंतु 100% विद्यार्थी अनुपस्थित कसे राहतात हा एक संशोधनाचा विषय आहे? परंतु विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता संबंधित शाळेच्या शिक्षकांनीच शाळेला सुट्टी असल्याचे सांगितल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत हा जिव्हाळ्याचा प्रश्न आंबेडकरी जनतेचा असल्यामुळे किंबहुना संविधान प्रेमी चा प्रश्न असल्यामुळे आंबेडकर समाजाला किंवा संविधान प्रेमींना हिमायतनगर तालुक्यातील संबंधित शिक्षण विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो काय हा प्रश्न निर्माण होत आहे ग्रामीण भागातल्या शाळा व्यवस्थित चालू असताना शहर बंद ठेवण्याचं कारण काय संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी याचा खुलासा द्यावा अशी सामान्य नागरिकांतून मागणी होत आहे शहरातील शिक्षकांना हॉलिडे साजरा करायचा का हा ही प्रश्न निर्माण होत आहे त्याच्या भविष्याकडे लक्ष न देता अशा आंदोलनाला तुम्ही शासनाचा कुठलाही निर्णय नसताना बंद ठेवून साध्य का करणार आहात प्रश्न उर्वरित आहे परंतु शासन निर्णय आदेशित नसताना आंबेडकरी जनतेशी किवा संविधान प्रेमी यांच्या विषयी दहशत निर्माण करण्याचं कार्य शिक्षण विभाग करतय काय?