जनहित मराठी – बाळासाहेब कोठुळे(पाथर्डी)
वेशभूषा सादरीकरण प्रकारात अंकिता गिरी जिल्ह्यात द्वितीय
पाथर्डी प्रतिनिधी- बाळासाहेब कोठुळे
अहमदनगर जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर येथे नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेमध्ये वेशभूषा सादरीकरण प्रकारात जि.प.प्राथमिक शाळा चितळी ता. पाथर्डी शाळेची विद्यार्थिनी कु. अंकिता नानासाहेब गिरी (किशोर गट) हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
तिच्या या यशामुळे तिचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार , विस्ताराधिकारी लहू भांगरे , केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, सरपंच अशोकदादा आमटे, उपसरपंच आदिनाथ आमटे, सदस्य बाबा आमटे, शा व्या स अदयक्ष अशोक कोठुळे, उपाध्यक्ष दादासाहेब ढमाळ सदस्य व पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी कौतुक केले.
चितळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता बर्डे, वर्गशिक्षक महेताब लदाफ, कैलास सदामत, अनुपमा जाधव,सविता राजपूत,राधिका खटावकर,सोनाली ससाणे, महादेव कौसे यां शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले.