गटविकास अधिकारी यांच्याकडे सावली दिव्यांग संघटनेची मागणी अन्यथा आंदोलन
मोदी आवास योजनेमध्ये OBC (ओबीसी) तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा या प्रवर्गाचा समावेश झाला असल्यामुळे शेवगाव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी मधून दिव्यांग बांधवाना प्राधान्य देणेबाबत कळवण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र झालेले दिव्यांग व्यक्तींना मोदी आवास योजनेत घरकुल मंजुरीत बाबत प्राधान्य मिळणेकामी शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांना तात्काळ लेखी आदेश काढून OBC (ओबीसी) प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीसह विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव तयार करून 5% प्रमाणे घरकुल मंजुरीत प्राधान्य मिळणेबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी पंचायत समिती शेवगाव कार्यालयातील कक्षधिकारी श्रीराम चव्हाण तसेच विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सावली दिव्यांग संघटनेचे चांद शेख यांनी केली आहे यावेळी घरकुल विभागाचे लिपिक तान्हाजी खैरे, किशोर कान्हे, चंद्रशेखर गरड उपस्थित होते.
मोदी आवास योजनेत दिव्यांग व्यक्तींना घरकुल मंजुरीत प्राधान्य याद्या तयार करून 5% प्रमाणे दिव्यांग बांधवांना मंजूरी न दिल्यास सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालूका तसेच शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवासमवेत दिनांक 04/03/2024 रोजी पंचायत समिती शेवगाव कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा सावली दिव्यांग संघटनचे बाबासाहेब महापुरे, चांद शेख, नवनाथ औटी, संभाजी गुठे, मनोहर मराठे, खलील शेख, अनिल विघ्ने, बाबासाहेब गडाख, गणेश महाजन, सुनिल वाळके, गणेश तमानके, बाहुबली वायकर,निर्मला भालेकर, अरुण गवळी यांच्यासह सावली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला आहे.
मोदी आवास योजनेत दिव्यांग बांधवांची तात्काळ दखल घेऊन शासन निर्णय व परिपत्रकाची अंबलबजावणी करून न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे. विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांनी सांगितले आहे की, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या असून लवकरच योग्य कार्यवाही केली जाईल. पंचायत समिती शेवगावचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी राजेश कदम साहेब दिव्यांगावर आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही याबाबत खात्री असल्याचे चांद शेख यांनी सांगितले .
चांद कादर शेख
अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगा