शेवगाव प्रतिनिधी:प्रमोद मिसाळ
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले युनूस चांद शेख यांनी खानापूर येथील हनुमान मंदिरात नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली.
उमेदवार युनूस चांद शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ खानापूर येथे करण्यात आला. खानापूरचे ग्रामदैवत हनुमान मंदिर या देवस्थानला श्रीफळ अर्पण करुन वियज मिळावा यासाठी साकडं घालण्यात आलं आहे. यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
मतदारसंघाच्या विकासासाठी मी उमेदवारी करत असून, आज पर्यंत प्रस्थापितांनी मतदारसंघाला विकासापासून कोसो दूर ठेवले असून, विकासासाठी टक्केवारी मागणाऱ्या प्रस्थापितांना घरी पाठवा असं आव्हान शेवगाव पाथर्डी अपक्ष उमेदवार युनुस चांद शेख यांनी खानापूर येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मत व्यक्त केले.
यावेळी नवनाथ ईसारवाडे, ऍड. अफरोज शेख, कलीम शेख, रवींद्र जगधने, संदीप जगधने,पप्पू चेडे, नवनाथ चौधरी, वसंत चव्हाण, करण जगधने, राजेंद्र राजेंद्र जगधने, देविदास निळ,भीमराव जगधने, बाबासाहेब झुंबड, सोमनाथ जगधने अजिंक्य मिसाळ, सार्थक झिंजुर्डे, राजेंद्र दसपुते, मालोजीराजे भोसले, मुसा भाई शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.