प्रतिनिधी: कृष्णा चौतमाल
हदगांव – अगोदरच गोरगरीब जनता हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेली असताना मटक्याने चटका लावला आहे. घरातील काहीही विकून किंवा व्याजाने खासगी सावकारांचे पैसे घेऊन अनेकजण मटक्याचे आकडे लावीत आहेत. यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
निवघा बाजार परिसरात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत.
चर्चेला निवघा शहरात ठिकठिकाणी मटक्याचे सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मटक्या चे स्टॉल थाटण्यात आले आहेत पानपट्टी मध्ये हॉटेलमध्ये खुलेआम मटका घेणे चालू आहे. तसेच निवघा बाजार परिसरात व सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात मटका सुरू आहे.
डोळ्यात धुळ फेकीत निवघा परिसरात व सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात मटका खुलेआम पद्धतीने सुरू असून या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देऊन चालु असलेले मोबाईल दु मोबाईल मटका, बंद करण्याची मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात केली जात आहे…..
…….
हदगांव तालुक्यातील कोळी येथे मोठ्या प्रमाणात मटका चालू आहे. विशेष म्हणजे यांना कोणाचीही भीती राहिली नसून हे बिनधास्त मटका चालवीत आहेत. गावातील तरुण व शाळकरी नवतरुण या मटक्यामुळे बरबाद होत आहेत. तरी सुद्धा याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मटक्याचे परंपरेने चालत आलेले ‘ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना,’ हे वाक्य कोळी परिसरात सत्यात उतरले आहे.