December 12, 2024 11:29 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » महाराष्ट्र » वाघोली गावचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे :उमेश भालसिंग (आदर्श सरपंच)

वाघोली गावचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे :उमेश भालसिंग (आदर्श सरपंच)

Facebook
Twitter
WhatsApp

पाथर्डी प्रतिनिधी- (बाळासाहेब कोठुळे)
आदर्श गावचे सरपंच उमेश भालसिंग यांची भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण सरचिटणीस पदी निवड झाली त्यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले गावाचे प्रेम अन आशीर्वादामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळत असते.मी कायमस्वरूपी सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत करील यावेळी वाघोली गावचे शिघ्र कवी आत्माराम जी शेवाळे यांनी त्यांचा सत्कार केला.
कधीकाळी काटेरी वृक्षाने विळखा घातलेल्या वाघोली गावाला एक आदर्श गाव बनवण्याची अभिनव संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ध्येयाने प्रेरित होऊन दिवस रात्र कष्ट करून गावातील तरुण तडफदार युवकांना बरोबर घेऊन विकासाची ही चळवळ गावामध्ये चालू केली.राजकारणातू न समाजाचा विकास कसा करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेवगाव पाथर्डी च्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सहकार्याने गावामध्ये विकासाची गंगा आणली.तसेच आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासारखे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावची विकास कामे त्यांनी हाती घेतली.त्यामध्ये स्मशानभूमी चे सुशोभीकरण, नदीवरील बंधारे, बंधाऱ्याचे खोलीकरण, रुंदीकरण, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, आदर्श ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर, रस्ते ,सांडपाणी, शाळेची इमारत, डिजिटल शाळा, यासारख्या अनेक विकासाच्या कामामधून गावाला एक नवीन दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे.यामुळे त्यांचे कार्य तालुक्या पुरते मर्यादित राहिले नसून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या कार्याची वेगळी छाप निर्माण झाली व ते चर्चेत आले आणि त्यामधूनच त्यांना भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. या सत्कंंराला उत्तर देताना उमेश भाऊ म्हणाले पदाचा आणि सत्तेचा वापर मी कायमस्वरूपी समाजातील तळागाळातील वंचित घटकासाठी करील.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी गावातील युवक कार्यकर्ते संभाजी ब्राह्मणे, सुभाष दातीर, अमोल शेळके, दत्तात्रेय दातीर, आदिनाथ दातीर, किसन पवार व अनेक मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य आत्माराम जी शेवाळे यांनी केले व दत्तात्रय दातीर यांनी सर्वांचे आभार मानले

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें