(पाथर्डी प्रतिनिधी)- बाळासाहेब कोठुळे पाथर्डी तालुक्यातील चितळी प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा ध्यास शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील युवक कार्यकर्ते उद्धव ताठे ,सोमनाथ ढमाळ व मेजर रामदास ताठे या त्रिमूर्तीने शाळेला संगणक संच भेट दिला असून विकास यशवंत आमटे या युवकांनीही आपल्या शाळेच्या ऋणातून उतराई व्हावी म्हणून संगणक संच शाळेला भेट दिला आहे
प्रजासत्ताक दिन साजरा करताना मुलांच्या उत्कृष्ट भाषणाबद्दल सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आमटे व उपसरपंच आदिनाथ आमटे यांनी रोख स्वरूपात बक्षिसांचे वाटप केले तर कुमारी जानवी ताठे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेच्या डिजिटल रूम मध्ये संगणक फिटिंग साठी रुपये अकराशे देणगी देण्यात आली युवक कार्यकर्ते उद्धव दादा ताठे यांनी ही देणगी दिली चितळी गावचे अध्यात्मिक क्षेत्रातील हरिभक्त परायण अशोक गर्जे यांची चिरंजीव गरजे मेजर ही भारतीय लष्करामध्ये सेवा करतात त्यांनीही शाळेसाठी भांड्याचा संच देण्याची जाहीर केले या अगोदर अमरावतीचे तहसीलदार व शाळेचे माजी विद्यार्थी संतोष काकडे यांनीही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळी ला संगणक संच भेट दिला आहे या सर्व देणगीदारांचे शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर सरपंच अशोक आमटे ग्रामपंचायत सदस्य बाबा आमटे उपसरपंच आदिनाथ आमटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक कोठुळे उद्धव ताठे, सोमनाथ ढमाळ ,ह .भ .प कृष्णा महाराज ताठे दादाभाऊ ढमाळ, विष्णुपंत ताठे ,संतोष कदम ,यशवंत आमटे, कविवर्य बाळासाहेब कोठुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता बर्डे ,अनुपमा जाधव ,सविता राजपूत ,सोनाली ससाने ,राधिका खटावकर केंद्रप्रमुख मेहताप लदाफ ,कैलास सदामत ,महादेव कौसे आदी मान्यवर उपस्थित होते
गावातील तरुण ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी हजर होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कौसे यांनी केले तर आभार कैलास सदामत यांनी मांडले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले
शाळा डिजिटल कार्याला माजी विद्यार्थ्यांचे योगदान
Facebook
Twitter
WhatsApp