जालना प्रतिनिधी: जनहित मराठी न्यूज नेटवर्क
काल दि. २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता अंतरवाली सराटी या ठिकाणी १७४ वे कीर्तन ह.भ.प डॉ. राधाकृष्ण महाराज अकोलकर यांच्या वाणीतून संपन्न झाले. महाराजांनी यावेळी संघर्ष योद्धा, मराठा समाजाची भूषण मनोज पाटील जरांगे यांच्या संघर्षमय मराठा आरक्षणाच्या उपोषण व मोर्चा संदर्भात खूप सविस्तर पद्धतीने प्रकाश टाकला.
महाराजांनी कीर्तनाची सुरुवात करताना पहिले वाक्य उद्गारले ते वाक्य होते “उद्या आरक्षणाचा सूर्य उगवणार आहे.”
आणि आपल्या संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या परिश्रमाचे फलित व सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे प्रयत्नाला यश मिळणार आहे. हा आशावाद त्यांनी सुरुवातीला व्यक्त केला. आणि आज महाराष्ट्र प्रशासनाने मनोज पाटील जरांगे यांच्या सर्व अटी मान्य केल्या. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात आहे. अंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा आरक्षणाचे साक्षी ठरले आहे. त्या गावातील ग्रामस्थांचे व मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या तमाम हातांचे महाराजांनी यावेळी कौतुक केले. मला देखील मराठा आरक्षणाच्या लढाईचा खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य लाभले हे माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.
महाराजांनी केलेल्या या कीर्तनाचे अंतरवाली सराटी ग्रामस्थ व सर्व मराठा बांधव त्यांच्या त्या वाणीसाठी त्यांना शुभेच्छा देत आहे. यावेळी महादेव महाराज गिरी,संतोष महाराज सोळुंके, डॉ. जालिंदर येवले, रवींद्र सातपुते, सुरेश अकोलकर, मस्के महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कीर्तनाचे व्हिडिओ चित्रन रामेश्वर डोईफोडे व चिराग फारोकी यांनी केले.
Home
»
महाराष्ट्र
»
उद्या आरक्षणाचा सूर्य उगवणार अंतरवाली सराटी येथून महाराजांनी केलेले विधान ठरले सत्य
उद्या आरक्षणाचा सूर्य उगवणार अंतरवाली सराटी येथून महाराजांनी केलेले विधान ठरले सत्य
- Janhit Marathi
- January 27, 2024
- 11:12 pm
- No Comments
Facebook
Twitter
WhatsApp