संपादकीय:
मराठा आरक्षणाचा लढा ताकतीने उभारून प्रत्येक तरुणाला इथल्या माता माऊल्यांच्या मनामध्ये आरक्षणाचा विचार खोलवर रुजवणारे मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ती शेवटपर्यंत ठाम राहिले इथल्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलाचा जो कुणबी असेल किंवा मराठा असेल त्या प्रत्येकाला आपला आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून स्वतःच्या परिवाराचा विचार न करता रात्रंदिवस फक्त एकच ध्यास होता तो म्हणजे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या आरक्षणाच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव यामध्ये ताकतीने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनीही स्वतःच्या जीवाची परवा न करता इथल्या तरुणांचं भलंभाव म्हणून स्वतःचा संपूर्ण वेळ या या आरक्षणाच्या लढ्यासाठी दिला.
मला आनंद या गोष्टीचा होतोय मी रात्री अंतरवाली सराटी या ठिकाणी कीर्तनाचं शूट करण्याकरिता गेलो होतो.
ह.भ.प डॉ. राधाकृष्ण महराज अकोलकर (संतपीठ श्रीक्षेत्र पैठण) या ठिकाणी 174 व पुष्प गुंफलं दि.26 जानेवारी रात्री साडेआठ वाजता या कीर्तनातून ते म्हणाले उद्याचा सूर्य विजयाचा जल्लोष घेऊन येणार आहे. आणि अगदी त्यांचे बोल हे आज खरे ठरले आहेत.हे किर्तन ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा सुरू झाला असे जगाला माहीत झालेले गाव अंतरवाली सराटी संपन्न झाले.या कीर्तनाचा साक्षीदार होत आले याचा देखील मोठा आनंद आहे
यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व हातांना जनहित मराठीचा सलाम आहे.
मनोज पाटील जरांगे यांनी एकनिष्ठेने हा लढा उभारला होता महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव यामध्ये सामील झाले ही इतिहासाने नोंद घ्यावी अशी महत्वपूर्ण बाब आहे.
सर्व मराठा बांधवांना जनहित मराठीच्या सर्व टीम कडून मनःपूर्वक अभिनंदन