प्रतिनिधी सचिन अभंग :जनहित मराठी न्यूज नेटवर्क
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील श्री रामेश्वर दास विद्यालयात प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी ध्वजारोहण मुरत पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांनी खूप अभ्यासपूर्ण भाषणे केली त्याचबरोबर बक्षीस वितरण गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले या लेझीम नृत्याने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी जनहित मराठीचे वृत्त संपादक सचिन अभंग यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याचे आवाहन केले. चांगल्या श्रेणीमध्ये येणाऱ्या मुलांना जनहित मराठी कडून ट्रॉफी प्रमाणपत्र रोख रक्कम बक्षिसे देखील दिले जाईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष श्री शिवाजी आप्पा पाटील, गावचे प्रथम नागरिक सरपंच अरुण भाऊ मातंग, सोसायटीचे चेअरमन सचिन भराट, महादेव अभंग, बंडू गलांडे, गणेश घोरतळे, शाळेचे मुख्याध्यापक खेरे सर त्याचबरोबर सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकरे सर यांनी केले.