शेवगाव प्रतिनिधी- अविनाश बूटे
जनहित मराठी न्यूज नेटवर्क
संविधानाचा आज उत्सव ,प्रजासत्ताक दिवसाच्या हा आनंद ,रंगबिरंगी तिरंगात,भारताचा गर्व आणि मान.असा हा भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आज श्रीराम विद्यालय देवगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मुरकुटे सर यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गोरक्षनाथ पाटील निकम हे होते तसेच व्यासपीठावर उपस्थित स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री कचरशेठदास गुंदेचा व भेंडा गण पंचायत समिती नेवासा ,चे सदस्य श्री अजित दादा मुरकुटे पाटील, लोकनेते मारुतराव घुले पाटील संत ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक श्री रावसाहेब पाटील निकम ,माजी सरपंच श्री महेश राव निकम ,ग्रामपंचायत सदस्य श्री ईश्वर काळे ,श्री तान्हाजी वाल्हेकर सर, नाजिम सलीम शेख व विद्यार्थ्यांचे पालक आणि सर्व शिक्षक बंधू व भगिनी आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते .आजच्या दिनाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांना लोकमत तर्फे मेडल देण्यात आले होते. त्याचे वितरण केले व मुला मुलींची भाषणे घेण्यात आली या मधून सर्व उत्कृष्ट भाषणे केलेल्या मुला मुलींना नाजीम सलीम शेख यांनी प्रत्येकी एक पेन कंपास पेटी मधील साहित्य व एक बिस्किट पुडा याच कार्यक्रमात बक्षीस म्हणून दिला प्रेरणा रुपी बक्षीस देण्याकरता मुख्याध्यापक यांनी विनंती केली असता लगेच तात्काळ हे बक्षीस नाजीम सलीम शेख यांनी उपलब्ध करून दिले आणि मान्यवराच्या हस्ते सर्वांना ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परदेशी सर यांनी केले आणि आभार गर्जे सर यांनी मांनले