पैठण(प्रतिनिधी)रामदास घोडके
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचा विकास करून विविध क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी व शिक्षकांनी त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांच्यातील कलेला वाव दिल्यानेच खरे विद्यार्थी घडतील असे मत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पाटेगाव केंद्राचे प्रमुख श्री.दिलीप थोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.शालांतर्गत घेतलेल्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कौतुक करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांने देशभक्तीपर गीते,समाज प्रभोधनपर नाटिका, महापुरुषांवर भाषणे,इ. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले,
पुढे बोलताना श्री.थोटे म्हणाले की विद्यार्थी दशेत असताना प्रत्येक पालकांने आपल्या पाल्यावर विशेष लक्ष ठेऊन त्याच्यामध्ये जे जे कलागुण आहेत त्यांची जाणीव करून देऊन त्याच्या उज्वल भविष्याची काळजी घ्यावी. आणि ज्याच्या मध्ये आपलं पाल्य निपुण आहे त्याला प्रोत्साहन देऊन त्याचा मार्ग सोपा करावा.
यावेळी शालेय कमिटीचे अध्यक्ष श्री.हेमंत रावस,पाटेगाव ग्रामपंचायत सरपंच श्रीमती. संजीवनी रावस,ग्रामसेवक श्रीमती पाटील मॅडम,ग्रामपंचायत सदस्य शुभम रावस,विशाल बोर्डे,गौरव रावस, रामदास घोडके,शिक्षक श्री.लक्ष्मण तहकीक, श्री.अंकुश म्हस्के, श्री.प्रशांत खताडे, अर्चना देशमुख, मनीषा जाधव,श्रीमती पवार मॅडम,तसेच अंगणवाडी च्या अर्चना रावस,शालिनी सनवे, श्रीमती करकसे,श्रीमती क्षीरसागर, लक्ष्मी काकू, गावातील तरुण ,जेष्ठ नागरिक,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.