प्रतिनिधी जनहित मराठी न्यूज नेटवर्क
भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य या परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महावितरणाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातर्फे साहित्य प्रकाश या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम महापारेषण,सभागृह हरसुल कारागृहासमोर छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला. मराठी भाषा संवर्धनासाठी भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषदेने केलेल्या कार्याचा नोंद घेत याचा गौरव व्हावा म्हणून, मुख्य डॉ. मुरहरी केळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ ‘साहित्य प्रकाश’ हा पुरस्कार डॉ. सर्जेराव जिगे यांना जाहीर झाला
व दिनांक 24 जानेवारी रोजी तो सन्मानपूर्वक त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. सर्जेराव जिगे मनोगतामध्ये बोलताना म्हणाले हा पुरस्कार हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यासह निष्ठेने काम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी स्वतःहून या कामासाठी वाहून घेतले आहे त्या सर्वांचा आहे. हा पुरस्कार त्या सर्व राबणाऱ्या हातांना मी समर्पित करतो व आणि या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी या नात्याने साहित्य प्रकाश या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करतो.
या मिळालेल्या पुरस्काराकरिता डॉ सर्जेराव जिगे यांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.