December 13, 2024 2:07 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » शिवस्वराज्य संस्थेच्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांची निवड

शिवस्वराज्य संस्थेच्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांची निवड

Facebook
Twitter
WhatsApp

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुनतगाव जिल्हा अहमदनगर यांच्यावतीने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासाफाटा जिल्हा अहमदनगर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.शिवस्वराज्य संस्थेच्या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक प्रसिद्ध गजलकार रज्जाकभाई शेख यांच्या निवडीची घोषणा शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केली आहे. यावेळी औरंगाबाद संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील,माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ,आमदार लहुजी कानडे, नागेबाबा मल्टिस्टेटचे कडूभाऊ काळे,महंत सुनीलगिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.संमेलनात स्थानिक कविसह राज्यभरातील निमंत्रित कवी , कवयित्री , कवितेचे अभ्यासक सहभागी होत आहे.
श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन,कन्नडचे तिफण संमेलन, श्रीरामपूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संमेलन तसेच औरंगाबाद येथील कविसंमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत.कार्यक्रम आयोजनासाठी संजय वाघमारे, धिरज कांबळे,बाबासाहेब शिरसाठ, सुनिल चव्हाण,ताईसाहेब वाघमारे, चंद्रकांत मोरे,सतिश म्हस्के, शांतवन खंडागळे, सुनील शिंदे,हरीश चक्रनारायन,आनंदा साळवे आदी परिश्रम घेत आहे.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें