पैठण प्रतिनिधी जनहित मराठी न्यूज
पैठण तहसील प्रशासनाने विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्पन्न व रहिवाशी मिळण्यापासून वंचित ठेवले आहे.
रहिवासी व उत्पन्नाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व महाविद्यालयीन मुलांना आपली शिष्यवृत्ती व इतर फॉर्म भरता आले नाही. याला सर्वस्वी जबाबदार तहसील प्रशासन पैठण आहे.
तहसील कार्यालयामध्ये उत्पन्न व रहिवासी संदर्भात विचारणा केल्यास तेथील कर्मचारी मुला मुलींना अरे रवी ची भाषा करतात.
या सर्व गोष्टींना कंटाळून विद्यार्थ्यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांना आज निवेदन दिले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या नमूद केल्या आहेत. व तहसील प्रशासनाला 30 जानेवारी पर्यंत जर प्रमाणपत्र मिळाले नाही. तर तहसील कार्यालयाच्या बाहेर 30 जानेवारी नंतर अर्ध नग्न अवस्थेत प्रमाणपत्राची भीक मागू असे निवेदनात म्हटले आहे.
पैठण तहसील प्रशासन याला किती गांभीर्याने घेते हा पाहण्याचा विषय आहे.
हे निवेदन चिराग फारोकी, अरबाज मणियार, आदित्य चेन्ने, सुधाकर सुलताने,उमेश ससाने,दिलवाले या विद्यार्थ्यांनी दिले.