शेवगाव प्रतिनिधी अविनाश बूटे
शेवगाव तहसील कार्यालयमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत आहेत. काही दिव्यांग व्यक्तींचे प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. काही दिव्यांग व्यक्तींनी दोन, तीन ते चार वेळा प्रस्ताव टाकलेले आहेत परंतू आजपर्यंत त्यांचे प्रस्ताव पात्र किंवा अपात्र देखील झालेले नाही. अजूनही प्रस्ताव मंजूरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संजय गांधी विभागातून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नाही असे कारण देऊन दिव्यांग व्यक्तींचे प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने अपात्र करण्यात येत आहेत. अपात्र केलेल्या दिव्यांग व्यक्ती संघटनेशी संपर्क साधत असून त्यांच्यावर अन्याय झाल्याबाबत सांगत असल्याचे निवेनात सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सांगितले. SADM प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र देखील ऑनलाईन आहे. परंतू दिव्यांग अधिनियम 2016 नुसार नवीन SADM स्वावलंबन प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याने सदर प्रस्ताव नामजूर करत आहेत. संजय गांधी विभागास नवीन दिव्यांग अधिनियम 2016 अंतर्गत स्वावलंबन दिव्यांग प्रमाणपत्र लागत असल्यास त्यांनी सदर प्रस्ताव डायरेट अपात्र न करता त्यांना दिव्यांग अधिनियम 2016 नुसार नवीन प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याबाबत त्रुटी पूर्तता करिता दोन महिन्याची मुदत द्यावी. जेणेकरून सदर दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालय येथे जाऊन दिव्यांग अधिनियम 2016 नुसार प्रमाणपत्र काढून आपल्या कार्यालयात सादर करतील. यामुळे दिव्यांग व्यक्तींना वारंवार प्रस्ताव सादर करण्यासाठी होणारा त्रास व आर्थिक झळ लागणार नाही. अशी मागणी सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख, नवनाथ औटी, संभाजी गुठे, मनोहर मराठे, खलील शेख, बाबासाहेब गडाख, अनिल विघ्ने,सुनिल वाळके, गणेश तमानके, गणेश महाजन, सोनाली चेडे, सकू मिसाळ, वंदना तुजारे, संजीवनी आदमने यांच्यासह आदी दिव्यांग बांधवाकडून होत आहे. शेवगाव तालुक्यातील सर्वं सेतू केंद्राला तात्काळ लेखी पत्र काढावे की ज्या दिव्यांग व्यक्ती यांच्याकडे दिव्यांग अधिनियम 2016 नुसार स्वावलंबन प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांचेच प्रस्ताव ऑनलाईन करावेत. ज्यांच्याकडे दिव्यांग अधिनियम 2016 स्वावलंबन प्रणालीचे प्रमाणपत्र नसेल त्यांना जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथून नवीन प्रणालीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सांगावे. यामुळे दिव्यांग व्यक्तींचा वेळ वाया जाणार नाही. तसेच दिव्यांग बांधवांना मनस्थाप देखील होणार नाही.
दिव्यांगासाठी आधार ठरत असलेली संजय गांधी निराधार योजना प्रभावीपणे राबवल्यास दिव्यांगाना चांगला लाभ मिळत आहे तहसीलदार साहेबांनी शेवगाव तालुक्यातील सर्वं सेतू चालकांना सूचना करून जे संजय गांधी अनुदान प्रस्ताव असतील ते तात्काळ संजय गांधी विभाग शेवगाव यांच्याकडे जमा करावेत. जेणेकरून 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षाअखेर जेवढे संजय गांधी योजनेचे प्रस्ताव असतील ते पात्र अपात्र ठरवता येतील. सदर आर्थिक वर्षात सादर झालेले एकही प्रस्ताव शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
चांद कादर शेख
उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था