तीन वर्षापासून सततचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्य हाता तोंडाशी आलेल पिकं वायाला जात आहे या अगोदर देखील प्रशासनान शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते आणि आपण आशा करूयात या गतवर्षी देखील शेतकऱ्याला मदत मिळेल. स्वतःची छोटी छोटी स्वप्न उराशी बाळगून तो रंगवत असतो शेतामधील हिरव चित्र आणि या चित्रांमध्ये मला वाटतं अखंड भारत समावलेलं असतं. हे हिरवगार स्वप्न शेतकरी फक्त त्याच्या स्वतःच्या परिवारासाठी फुलवत नसून या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं आणि जीवन जगण्यासाठी अन्न मिळावं म्हणून प्रयत्न करत असतो. मेहनत करण्याची जिद्द जर आपल्याला कुणाकडून शिकायची असेल तर तो फक्त शेतकरी असं मला वाटतं अनेक वेळा शेती पीक खराब होऊन ही पुन्हा पेरण्याची तयारी ठेवणारा म्हणजे तो शेतकरी. गेल्या चार वर्षांमध्ये आपण पाहत आलो आहोत की सतत जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्याचा ओतणात नुकसान झालेलं आहे.
चालू वर्षी 2021-22 या वर्षाचा आराखडा आपण जर पाहिला तर भरमसाठ स्वरूपात पाऊस पडलेला आहे.
आणि या पावसामुळे शेतकऱ्याची स्वप्न अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकऱ्याचे स्वप्न असतात काय? शेतामध्ये डोलणाऱ्या पिकावरती तो त्याच शेतीसाठी खते,बी-बियाणे,औषध शेतीला लागणारी अवजारे तसेच मशागत या सर्व गोष्टी उधारीने करत असतो परंतु अशाप्रकारे आसमानी संकट जर त्याच्यावरती ओढावलं तर ही सर्व घेतलेली उसनवारी किंवा उधारी कशी फेडावी हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो या सर्व कामासाठी तो बँकांचे कर्ज देखील घेतो परंतु पीक खराब झाल्यामुळे परतफेड करू शकत नाही एकीकडे परिवार असतो एकीकडे शेती असते अशा दुविधा जन्य अवस्थेत शेतकरी पडलेला असतो. मुलांची फीस असेल, परिवारासाठी लागणाऱ्या वस्तू, कपडे, जनावरांसाठी लागणार खर्च, त्यामध्ये जर सन उत्सव असेल त्यासाठी लागणारा खर्च या सगळ्या गोष्टींचा मेळ म्हणजेच त्याचे स्वप्न आहेत.
या स्वप्नांना तो मेहनतीची जोड देत असतो आणि अपार कष्ट करून शेतीमध्ये हिरवं सोन पिकवत असतो. परंतु आसमानी संकटाला काहीच करता येत नाही त्या ठिकाणी त्याचा मात्र नाईलाज होतो. शेतकऱ्याला आपण सर्व राजा म्हणतो परंतु या राजाची अवस्था सध्या खूप वाईट झालेली आहे.
बीड जिल्ह्यातील परवाची बातमी आहे. सोयाबीनचे पीक संपूर्णपणे वाया गेल्यामुळे तरुण शेतकऱ्यांन आत्महत्या केली.
लेकरासारखं जपलेलं वाढवलेलं पीक जर डोळ्यादेखत वाया जात असेल तर यासारखे दुर्दैव दुसरे कोणतच नाही.
त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्याचे असंख्य प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना खरंतर आता सोडवणे गरजेचे आहे.
जर अशाच प्रकारे चालू राहिलं तर शेतीकडे वळणारा वर्ग फार कमी असेल आणि कालांतराने खूप अडचणींचा सामना सर्वांना करावा लागेल. दीपावली हा सण शेतकरी खूप उत्साहात साजरी करतात परंतु चालू वर्षी खूप पाऊस झाल्यामुळे कपाशी,सोयाबीन,फळबागा सर्व पिके उध्वस्त झाली आहेत शेतकऱ्याला दिवाळी करण्यासाठी काहीही उरलं नाही. प्रत्यक्ष शेतामध्ये पाहिल्यानंतर परिस्थिती लक्षात येत असते परंतु आपल्या राज्याचे माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी कुठलीही परिस्थिती महाराष्ट्रात नाहीये मला वाटतं अब्दुल सत्तार हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती गेले असावेत. म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं केलं असेल.
प्रत्यक्ष पाहणी नंतर लक्षात बऱ्याचशा बाबी येतात एसी च्या रूम मध्ये बसून बड्या बाता मारण्यात कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं म्हणजे शेतकऱ्याला लढण्यासाठी बळ मिळेल. सध्या स्थितीला खूप सारा तरुण वर्ग शेती करण्यासाठी वळला आहे आणि तरुण वर्गाला सोशल मीडिया वापरण्याचं ज्ञान आहे मला वाटतं आपले सर्वांचे प्रश्न आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायला हवेत आपल्या प्रश्नासाठी भांडायला हवे तेव्हाच मला वाटतं कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळेल.
सध्या शेतकरी ओला दुष्काळा जाहीर करून अनुदानाची मदत मागत आहेत मला वाटतं की शेतकऱ्यांची ही मागणी अगदी रास्त आहे.
तुम्हा सर्वांना या संदर्भात काय वाटते आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
के.बी.शेख
(संपादक जनहित मराठी)
कृषीप्रधान देशात शेतकऱ्याचा विचार व्हायला हवा हा लेख नक्की वाचा
- Janhit Marathi
- January 24, 2024
- 12:05 am
- No Comments
Facebook
Twitter
WhatsApp