हातगाव जिल्हा परिषद शाळेचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत
जनहित मराठी प्रतिनिधी: निलेश ढाकणे
फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या सावित्रीबाई प्रज्ञाशोध परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, या परिक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत हातगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चार व तालुका गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
राहुरी येथील क्षितीजा प्रकाशनाच्या वतीने ही प्रज्ञाशोध परिक्षा आयोजित करण्यात येते, मुलांना आतापासूनच स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी व त्या दृष्टीने त्यांनी तयारी करावी या हेतूने या परिक्षेचे आयोजन करण्यात येते.
हातगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या मुलांनी या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
कु. कासुळे सृष्टी चि.वाघमारे विपुल चि.भिसे स्वानंद कु.ढाकणे अंजली या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे तर कु.आयोध्या सुपेकर व चि.पृथ्वी खेडकर यांनी शेवगाव तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.कु.स्वरा काळे हीने देखील चांगले यश संपादन केले आहे.या यशासाठी हातगाव सह पंचक्रोशीतील शिक्षक- पालक वर्गाने या लहाणग्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री गणेश पुरूषोत्तम सर वर्गशिक्षक श्री विष्णू वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख श्री पिंगलर साहेब व बोधेगाव बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री गाडेकर साहेब,गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते मॅडम यांनी देखील या मुलांचे कौतुक केले आहे.