December 13, 2024 12:02 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

हातगाव जिल्हा परिषद शाळेचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत

हातगाव जिल्हा परिषद शाळेचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत जनहित मराठी प्रतिनिधी: निलेश ढाकणे फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या सावित्रीबाई प्रज्ञाशोध परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, या परिक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत हातगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चार व तालुका गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. राहुरी येथील क्षितीजा प्रकाशनाच्या वतीने ही प्रज्ञाशोध परिक्षा आयोजित करण्यात … Read more

पैठण पंढरपूर महामार्गावर चालत्या मोटरसायकलचा बर्निंग थरार

पैठण पंढरपूर महामार्गावर चालत्या मोटरसायकलचा बर्निंग थरार

जनहित मराठी प्रतिनिधी: निलेश ढाकणे

आज शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी चार च्या सुमारास पैठण पंढरपूर पालखी मार्गावर एका चालत्या दुचाकी ने पेट घेतला व जळून खाक झाली, दुचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याला काहीही हानी पोहचली नाही.
सविस्तर हकीगत असी की, श्री गणेश राजेश ढाकणे (वय 24) हे आपली दुचाकी (Splendor plus MH 16 DJ 4736) घेऊन पैठण येथे गेले होते, पैठण येथून आपल्या गावाकडे म्हणजे लाडजळगाव ता शेवगाव कडे येत असताना पैठण पंढरपूर पालखी मार्गावर हातगाव ता शेवगाव येथे आले असता त्यांच्या असे लक्षात आले की गाडीच्या सिटा खालून धुर निघत आहे व उष्णता जाणवत आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली दुचाकी थांबवली व स्टॅण्ड ला लावून खाली ऊतरले तर गाडी पेट घेत असल्याचे समजताच ते गाडी पासून दूर झाले, काही क्षणात गाडी आगीच्या विळख्यात सापडली व पेट्रोल टाकीचा स्फोट झाला, पाच मिनिटांच्या आत गाडी जळून खाक झाली होती.घटनास्थळी त्या दुचाकीचा फक्त सांगाडा (चेसी) उरला आहे.
गणेश ढाकणे यांनी काही महिन्यांपूर्वीच ही गाडी घेतली होती, त्यांनी सदरील हकीकत संबंधित मोटारसायकल च्या शोरुमला कळवली, शोरुम च्या माणसांनी घटनास्थळी येऊन घटनेची शहानिशा केली आहे.परंतु गाडीने पेट का घेतला हे मात्र समजू शकले नाही.

राज्य चुनें

राज्य चुनें