जनहित मराठी प्रतिनिधी: चिराग फारोकी
संत एकनाथ महाराज यांचे भारुड,एकनाथी भागवत या रचना मानवी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आहेत, या संसार रुपी भयसागरातून तारूण नेणाऱ्या आहेत असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्य मंत्री आ.राजेश टोपे यांनी जनहित मराठीशी बोलताना केले.
काल एकनाथ महाराज षष्ठी महोत्सव निमित्ताने माजी मंत्री राजेश टोपे हे पैठण येथे आले होते,संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जनहित मराठी सोबत संवाद साधला,ते पुढे म्हणाले की,”संत एकनाथ महाराज यांनी आपल्या ला भक्तीचा मार्ग दाखवला आहे, आपण या मार्गाने चाललो तर आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील, म्हणून मी नित्य नेमाने षष्ठी महोत्सवात दर्शनासाठी येत असतो.राज्यभरातील भक्त मोठ्या संख्येने दिंडी पालखी च्या माध्यमातून या ठिकाणी येतात,व आत्मीय आनंद मिळवतात” आमच्या प्रतिनिधींनी नाथरांयाकडे काय मागितले असे विचारले असता ते म्हणाले की “राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी वर्गाला चांगले दिवस यावेत” असी नाथराया चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
भाविक भक्तांच्या गर्दीने काल पैठण नगरी गजबजली होती, या वेळी वार्तांकन करण्यासाठी जनहित मराठी ची संपूर्ण टिम उपस्थित होती, गर्दी चे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, भक्तांना मिळणाऱ्या सोई सुविधा आदी बाबी या वेळी पाहण्यात आल्या.शौचालयाची व्यवस्था विषयी काही भक्तांनी नाराजी व्यक्त केली,तर बाकी सुविधा चांगल्या असल्याचे देखील अनेक भाविकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.