विधीज्ञ संजय सानप यांचा ‘चर्चेतला चेहरा’ म्हणून दिव्य मराठी कडून सन्मान
(केद्रींय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते दिव्य मराठीचा सन्मान स्विकारताना ॲड.संजय सानप व कुटुंबीय)
शेवगाव प्रतिनिधी निलेश ढाकणे: शेवगाव येथील ॲड. संजय भास्करराव सानप यांचा दिव्य मराठी या आघाडीच्या दैनिकाकडून चर्चेतील चेहरा या उपक्रमा अंतर्गत सन्मान करण्यात आला.
दिनांक ११ रोजी संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ॲड.संजय सानप यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन,त्यांचे कार्य समाजापुढे यावे यासाठी दैनिक दिव्य मराठी कडून ‘चर्चेतील चेहरे’ या उपक्रमा अंतर्गत निवडलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती देणारे ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशित करण्यात आले.या बुक मध्ये विधीज्ञ संजय सानप यांच्या प्रोफाइल चा समावेश करण्यात आला आहे.या प्रोफाइल मध्ये ॲड.संजय सानप यांच्या आतापर्यंत च्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पेशाने वकील असलेले ॲड. संजय सानप सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.आपल्या वकिलीच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत पाच ते सहा हजार फौजदारी व दिवाणी खटले निकाली काढले आहेत.त्याचबरोबर या पेक्षा दुप्पट प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच मिटविले आहेत.कुणाचीही आर्थिक पिळवणूक होणार नाही याची काळजी घेत, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असी भुमिका ठेवणारे ॲड.संजय सानप, नगर जिल्ह्यातील एक प्रामाणिक वकिल म्हणून ओळखले जातात.
अनेक संस्थांवर ते कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या समितीवर ते २००८ पासून कार्यरत आहेत. पूर्णावादी बँक लिमिटेड बीड या बँकेच्या पॅनलवरही ते कार्यरत आहेत. याशिवाय, भगवानबाबा मल्टिस्टेट सहकारी बँक शाखा बोधेगाव आणि शेवगाव तसेच सिताबाई अर्बन बँक लिमिटेड शाखा बोधेगाव या संस्थांच्याही कार्यकारीणीत ते सेवा देत आहेत.
आपण ज्या भागात लहानचे मोठे झालो त्या भागाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून त्यांनी बोधेगाव येथे श्री स्वाध्वी बन्नोमा पतसंस्था स्थापन करुन गरजूंना आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्याचबरोबर शेवगावसह नगर जिल्ह्यात होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात ॲड. संजय सानप यांचा सक्रिय सहभाग असतो.
दिव्य मराठी कडून मिळालेल्या या सन्मानासाठी ॲड. संजय सानप यांचे समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
- “वडीलांनी सांगितले होते की, पैशाची
कितीही गरज पडली तरी ती मी पूर्ण करेन. पण, वकिली व्यवसाय करत असताना सामाजिक भावनेतून आणि माणुसकीच्या नजेरतून कर. घरामध्ये कुणाचीही तळतळ व हळहळ येता कामा नये.ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य करावे”
ॲड.संजय सानप