विहामांडवा येथे नेत्र तपासणी शिबिरात 150 रुग्णांची तपासणी
विहामांडवा प्रतिनिधी /इम्तीयाज शेख
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे चंपा भवन जैन मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पैठण महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा संजय कुलकर्णी व रवि छाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाली. या शिबिराचे उद्घाटन स्वातीताई संतोष कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पैठणचे नेते आप्पासाहेब निर्मळ ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पैठण तालुकाध्यक्ष विजय चव्हाण , शहराध्यक्ष जितु परदेशी रावसाहेब दादा अडसूळ, सदाशिव मोटकर,प्रकाश दिलवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष स्वातीताई कोल्हे म्हणाल्या की महिला सक्षमीकरण व जनतेचे आरोग्य विषयी कार्यक्रम असतील हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून केले जातात यापुढे देखील आमचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी पैठण तालुक्याच्या जनतेच्या सेवेत हजर राहतील .
यावेळी 150 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांना चष्मे वाटप करण्यात आली तसेच मागील घेतलेल्या नेत्र शिबिरामधील ५१ लोकांचे चष्मे देखील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आप्पासाहेब निर्मळ, रावसाहेब अडसूळ, देवगिरी बँकेचे मॅनेजर सुनील देशमुख, विजय चव्हाण यांचे समयोजित भाषण झाली. या कार्यक्रमाला जनतेची भरपूर गर्दी होती.
यावेळी प्रज्ञा संजय कुलकर्णी पैठण तालुका महिला अध्यक्ष, गणेश भांगळ पैठण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संजीवनी तांबे पैठण तालुका महिला उपाध्यक्ष, मोहन रोडगे विहामांडवा सर्कल प्रमुख, अभय ब्रह्मराक्षस, अनिल हकम, योगेश देशमाने, प्रीतम पाटील गाभूड, गोविंद पांढरे, विशाल पानझडे, किरण जाधव, रोहित तांबट, यश नवपुते, वैभव वावळ, प्रमोद काळे, नवनाथ गायकवाड देवगिरी बँकेचे मॅनेजर सुनील देशमुख, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील गाभूड सह भरपूर महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले.डॉक्टर शितल शिरसाट, डॉक्टर मनोज सोलंकी, डॉक्टर मंगेश कुलकर्णी, व त्यांचे सहकारी पिंगळे यांनी दिवसभर नेत्र तपासणी केली.