राज्यस्तरीय काव्य संमेलना अध्यक्षपदी कविवर्य गोरक्षनाथ पवार यांची निवड
जनहित मराठी पाथर्डी प्रतिनिधी :बाळासाहेब कोठुळे
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील निंभोरी येथील जेष्ठ कवी गोरक्षनाथ पवार यांची लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने निवड करण्यात आली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पवार यांनी दिली अध्यक्ष निवडीचे पत्रही कविवर्य पवार यांना देण्यात आले
दिनांक 10 मार्च रोजी होत असलेल्या या संमेलनामध्ये राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरणही होणार आहे सकाळी ठीक अकरा वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल तसेच सर्व सहभागी कवींना आपली एक कविता सादर करण्याची संधी मिळेल व मान्यवरांच्या हस्ते कवीला सन्मानित करण्यात येईल अशी माहिती ही संयोजकांनी दिली आहे
कविवर्य गोरक्षनाथ पवार यांची साहित्याशी अनेक वर्षापासून घट्ट नाळ जोडली गेली आहे हा शब्दांचा जादुगार असून आपल्या लेखणीने साहित्यातील अनेकांना त्याने आपलेसे केले आहे शब्दांचा हा अवलियाच म्हणावा लागेल ग्रामीण भागात वास्तव्याला राहून आपल्या दमदार शब्दाने कवितेला भारदस्तपणा आणणारा हा साहित्यिक अनेक पुरस्काराचा खऱ्या अर्थाने मानकरी ठरला आहे 2023 चा साहित्य क्रांती पुरस्कार बोरिवलीचे तत्कालीन खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते व श्रीरामपूर येथील ख्यातनाम गझलकार व आवाजाचा बादशहा कवी रज्जस शेख सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाला तसेच महाराष्ट्र कृषी रत्न पुरस्कार 2023 राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार अशी अनेक पुरस्कर त्यांना प्रदान करण्यात आली आहे महाराष्ट्रातील अनेक काव्य संमेलना मधून त्यांची कविता गाजत आली त्यांच्या या कार्यामुळे त्यांना संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे
काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्याकरता कवींनी पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे बाबासाहेब पवार 87 96 74 22 43 व कवी गोरक्षनाथ पवार 97 63 73 81 80 या क्रमांकावर कवींनी संपर्क करावा संयोजन समितीने कळविले आहे