शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव- ने संचलित श्री रामेश्वर दास माध्यमिक विद्यालय हातगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला
जनहित मराठी शेवगाव प्रतिनिधी: अविनाश बुटे
रामेश्वर दास माध्यमिक विद्यालय हातगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आनंदात संपन्न झाला यावेळी स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील व श्री रामेश्वरदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दहावीच्या विद्यार्थ्याकडून प्रमुख पाहुण्यांचा व गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील (आप्पा) अध्यक्ष शालेय समिती व्यवस्थापन प्रमुख पाहुणे श्री नजर के, वाय. प्रशासकीय अधिकारी, मा.सौ .मायाताई नवथर सामाजिक कार्यकर्त्या, सरपंच अरुण भाऊ मातंग श्री अंकुश पोटभरे सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खैरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील विद्यार्थी गुंजाळ आरती भालेराव श्वेता दहावी, शेख हिना चौधरी समीक्षा , नववी या विद्यार्थिनी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत आपल्या मित्र मैत्रिणी सोबत अल्लड मस्करीचे किस्से सांगत आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना भावनिक केले या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला निरोप देत असताना आठवण म्हणून शाळेला भेटवस्तू देखील देण्यात आली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती साक्षी अभंग या विद्यार्थिनींनी आभार मानले
यावेळी विद्यालयाच्या वतीने शिक्षक म्हणून निवड झालेल्या माजी विद्यार्थी श्री.अमोल विश्वनाथ जऱ्हाड यांच औरंगाबाद कृषी विभागात वरिष्ठ लिपक पदासाठी व श्री.सचिन बबन अभंग कोल्हापूर प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षक पदी व जिल्हा परिषद रायगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे समीर पठाण यांची प्राथमिक पदवीधर शिक्षक पुणे येथे निवड झाली तसेच त्यांच्या पत्नी सौ. फिजा पठाण यांची पुणे येथे माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झाली या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कार्तिकी अकोलकर, मयुरी अभंग यांनी केले