पैठण:जनहित मराठी न्यूज नेटवर्क
“साहित्य उपेक्षितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम करते. वंचितांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देते. त्याचबरोबर जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. जे साहित्य समाज हित जाणते तेच खरे साहित्य आहे. साहित्यातून जीवन सुंदर बनते, जीवनाला आकार देण्याचं काम साहित्य करते. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या माध्यमातून दुर्लक्षित आणि व्यवस्थेतील मुख्य प्रवाहामध्ये आजपर्यंत स्थान न मिळालेल्या कवी- लेखकांना लेखनाची प्रेरणा आणि विचारपीठ मिळवून देण्याचं काम होत आहे.” असे मत- भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद आणि मराठी विभाग, ताराई कला व विज्ञान महाविद्यालय पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या पैठण शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना डॉ. सर्जेराव जिगे यांनी व्यक्त केले. पैठण येथील ताराई कला व विज्ञान महाविद्यालयातील स्व. त्रिंबकदासजी पटेल सभागृहात साहित्य परिषदेचा पैठण शाखा उद्घाटन समारंभ आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त निमंत्रितांचे कवी संमेलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अनोख्या पद्धतीने वृक्षांना जलापर्ण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन मसाप चे प्रा.संतोष तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. संतोष चव्हाण, तर ताराई शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. रंजना पाटीदार, जनहित न्यूज चे वृत्तसंपादक सचिन अभंग, भा.सा.सं.सं.परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सर्जेराव जिगे , संतपिठाचे ह.भ.प श्री.अकोलकर महाराज, श्री.सुभाष शिंदे, श्री.सोनुने सर यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतोष चव्हाण यांनी पैठण शाखेची कार्यकारिणी घोषित करून प्रा.डॉ.गणेश शिंदे यांची पैठण तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा. संतोष तांबे म्हणाले की, “भा. सा. सं. आणि संशोधन परिषद ही ग्रामीण भागातील लेखक कवींना मुक्त विचारपीठ निर्माण करून देत आहे. साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक मोठमोठी संमेलने आयोजित करून अनेक समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. ग्रामीण लेखक- कवीसाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. डॉ. रंजना पाटीदार बोलताना म्हणाल्या की, “लेखन आणि वाचनातून निर्भेळ आणि उच्चानंद प्राप्ती होते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन साहित्य निर्माण करते.म्हणून विद्यार्थी आणि वाचकांनी आपले जीवनानुभव साहित्यातून मांडले पाहिजे.” या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाड, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रामेश्वर मस्के, प्रा.सुनिता पाठक, निलेश सनवे,संजीवनी बनसोडे, घनश्याम ढोरकुले, नवनाथ ढोले, नवनाथ निळ, पत्रकार राहुल पगारे, रामेश्वर सुसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. डॉ.रामचंद्र झाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अनेक दिग्गज कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून रसिकांचे मन जिंकले. स्वामी बोबडे यांनी सादर केलेली, “मी नटीच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून लय राग आला काय मित्रा,पण राज रोस आया बहिणीवर अत्याचार झाल्यावर तुला राग कसा नाही येत रे मित्रा” ही समाजातील विदारक परिस्थिती मांडली. सरिता खराद/भांड यांच्या “आई” या हृदयस्पर्शी कवितेने रसिकांचे डोळे पाणावले. “तोंडावर मधासारखं गोड बोलायचं,मनात मिठासारखं खारट,मग सांगा ना-माणसानं माणसासोबत माणसासारखं कधी वागायचं” असं म्हणत राहेल घोडके या बाल कवियत्रीने माणसाच्या जगण्याची रीत सांगितली. आभाळ माती कार प्रसिद्ध कवी शहादेव सुरासे यांनी “मह्या जलमाची कहाणी” ही रचना सादर करून दारिद्र्यात संघर्ष करणाऱ्या आईची करूण कहाणी सांगितली. “एक कविता अशी स्फुरावी जी काळजाला छेदून जावी,ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबांची गाथा व्हावी” या पैठणच्या प्रसिध्द कवी रामदास घोडके यांच्या कवितेने रसिकांची मने जिंकली. बीड येथील आकांक्षा सोनवणे यांनी सादर केलेल्या हिंदी रचनेला प्रेक्षकांची भरपुर दाद मिळाली. कवी अविनाश बुटे यांची प्रियसीची स्तुती करणारी ” सजने तुझ्यात जीव दंगला” ही रचना आठवणीत राहीली. या वेळी आयुब शेख,पूनम राऊत,महेश मगर,सुचित्रा राऊत,ऍड.गणेश शिंदे,विशाखा पाटेकर, वसंत अभंग,पत्रकार मदन आव्हाड,गायत्री ठाकूर इ.कवींनी आपल्या रचना सादर केल्या तर के.बी शेख आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने कमालीची रंगत आणली.
साहित्य परिषदेची नवनिर्वाचित पैठण तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे-
डॉ. गणेश शिंदे-अध्यक्ष, के.बी.शेख -कार्याध्यक्ष,
शहादेव सुरासे – (तालुका कार्यकारणी सल्लागार)
योगेश गावडे / ईश्वर अडसूळ – उपाध्यक्ष,
रामदास घोडके -तालुका समन्वयक,
चिराग फारुकी – प्रसिद्धी प्रमुख,
स्वामी बोबडे – सचिव,
रमेश गव्हाणे – स. सचिव,
प्रदीप गायकवाड -कोषाध्यक्ष, ऍड. गणेश शिंदे- सह कोषाध्यक्ष,
लक्ष्मण खेडकर – सदस्य,
मुकेश पडूंरे -सदस्य,
सचिन पांडव -सदस्य,
सुदाम पोल्हारे -सदस्य,
सुधाकर सुलताने-सदस्य,
विकास नरवडे-सदस्य ,
अविनाश बुटे -सदस्य,
सचिन अभंग-सदस्य,
नारायण कवले-सदस्य,
अय्यूब शेख – सदस्य,
आदित्य चन्ने – सदस्य,
गुलाब शेख -सदस्य,
नवनाथ नीळ -सदस्य,
गणेश राऊत -सदस्य,
सलीम पठाण – सदस्य,
प्रा. स्वप्निल बोधने- सदस्य,
मोतीलाल घुंगासे-सदस्य,
सरिता खराद- सदस्य,
राहेल घोडके- सदस्य,
विशाखा पाटेकर -सदस्य,
आकांक्षा सोनवणे- सदस्य