जनहित मराठी/अविनाश बुटे
शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ड्रॉइंग या घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल 91.30 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 23 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये बोधेगाव केंद्रात ए ग्रेड मध्ये दोन विद्यार्थी व बी ग्रेड मध्ये दहा विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
त्यापैकी रामेश्वर दास विद्यालयाचे एक विद्यार्थीनी A ग्रेडमध्ये व चार विद्यार्थी B ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी श्री रामेश्वर दास विद्यालयचे संस्थापक स्व. लोकनेते मारुतीराव घुले पाटील यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र पालकांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेमध्ये A ग्रेड अनिशा संतोष शिंदे , सुहाना शामद शेख
B ग्रेड प्राप्त झालेले विद्यार्थी
समिक्षा राजेंद्र चौधरी,ज्ञानेश्वरी भाऊसाहेब देशमुख,धनश्री राजू कोल्हे,श्रुती राजेंद्र मुरकुटे, तनुश्री सुभाष भालेराव, सायली गणेश शिंदे यांना मिळाले
या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सिकंदर शेख सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
यावेळी,शाळेच्या वतीने सर्व पालकांचे सत्कार करण्यात आले.
सोसायटी चेअरमन सचिन भरट ,बाळासाहेब बावणे,पत्रकार अविनाश बुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, ज्याप्रमाणे मुलींनी जास्त प्रमाणात स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. त्याचप्रमाणे मुलांनी देखील स्पर्धेत उतरावे असे आवाहन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक खेरे सर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या यशासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अंकुश दादा अभंग भाऊसाहेब देशमुख शामद शेख बाळासाहेब अभंग गणेश भिंगारे राजू चौधरी निसार पठाण राजू कोळी सुभाष भालेराव नागेश अभंग व सर्व शिक्षक वृंद गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत वाघ सर यांनी केल.