पैठण प्रतिनिधी के.बी शेख (जनहित मराठी)
तांडा बुद्रुक व इनायतपूर या ग्रुप ग्रामपंचायत च्या अंतर्गत निवडीमध्ये श्रीमती सरला उत्तमराव नरवडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. ही निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ बोडले, आप्पा नरवडे, कल्याण चाबुकस्वार, कैलास पोलसने, गणेश पा. नरवडे, कल्याण छबिलवाड, सोपान काका ढोरकुले, शंकर पाटील गोर्डे, तसेच समस्त गावकरी तांडा बुद्रुक खुर्द यावेळी उपस्थित होते. या निवडीसाठी ग्रामस्थांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
प्रतिक्रिया
काल संपन्न झालेल्या निवडीतील सरपंच सदस्य सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
अच्युत मिसाळ
(माजी ग्रामपंचायत सदस्य)