औरंगाबाद प्रतिनिधी
काल दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी औरंगाबाद येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मुस्लिम कवींची मराठी कविता’ स्वामी विवेकानंद कॉलेज व प्रगतशील साहित्य संघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी निमंत्रित कवी म्हणून, प्रसिद्ध कवी गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने,कवी हबिब भंडारे,कवी शब्बीर शेख,कवी के.बी शेख, कवयत्री शमा बर्डे, कवी परवेज शेख, कवी डॉ. सय्यद मोहसीन हे कवी उपस्थित होते. या ठिकाणी चंद्रकांत तायडे संपादित स्त्री शक्ती मंच 2024 या नियतकालिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. शब्दातून विचार येतो आणि विचार माणसाला प्रकल्प करतो मुस्लिम साहित्यिक देखील मराठी भाषेवरती खूप प्रेम करतात आणि या साहित्य क्षेत्राला त्यांचे खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन डॉक्टर सुधाकर शेंडगे यांनी केले. यावेळी वर्षा व्हगाडे (सह पोलीस निरीक्षक) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या साहित्य माणसाला प्रकल्प बनवते विचार करण्यासाठी शक्ती प्रदान करते. आणि विचार करणारा माणूस कधीही वाईट कृत्य करत नाही. सोशल मीडिया वरती तरुणाई खूप बरगटलेल्या अवस्थेत दिसून येते असेही त्या यावेळी म्हणाल्या. श्रीवादाच्या अभ्यास संचिता राऊत यांनी देखील स्त्रियांचे प्रश्न खूप व स्त्रियांपुढील आव्हाने या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थिती, सह पोलीस निरीक्षक आरती जाधव, लेखिका संचिता राऊत, सह पोलीस निरीक्षक वर्षा व्हागडे, डॉ सुधाकर शेंडगे (राज्य कार्यवाहक प्रगतशील साहित्य संघ), डॉक्टर दादाराव शेंगुळे (प्राचार्य विवेकानंद महाविद्यालय), डॉ. दत्तात्रय प्र. डुंबरे (प्रमुख मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र), कवयत्री आशा डांगे (राज्य सहसचिव, प्रगतशील लेखक संघ) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला रसिक स्मृती देखील बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले.