- गंध मातीचा छंद मातीचा या मातीचा अभिमान आहे,,मी वारस आहे या मातीचा मला संघर्ष करणे पसंत आहे .
आज एका धेय्य वेड्या मुलाची खरी कहाणी घेऊन माझी लेखणी मला सांगते या सदरात मी घेऊन आलो आहे पवन निंबाळकर यांची सत्यकथा जि भरली आहे मेहनतीने संघर्षाने व शेवटी यशाने ही कथा देणार आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना सकारात्मक दृष्टीकोन व मेहनत करण्यासाठी जिद्द, दिनांक 8 मार्च 2019 रोजी माझ्या जन्मदिनी निकाल लागला आणि चे ,,,खूप जणांचे ज्या डिपार्टमेंट बद्दल नकारात्मक विचार भावना आहे अशा पोलीस खात्यात मी पीएसआय म्हणून निवडला गेलो.मी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला कारण मला माहीत होतं की माझ्या सकारात्मक दृष्टिकोनातून मला एक दिवस नक्की यश मिळणार.सकारात्मक तेचा पहिला अनुभव मला त्याच दिवशी मिळाला इतके दिवस निकाल पेंडिंग होता,आणि माझ्या जन्म दिनाच्या दिवशी मी सहज डोळे मिटून झोपलो होतो अचानक मला असं वाटलं की आज निकाल लागणार असा विचार माझ्या मनामध्ये घोळत होता आणि तेवढ्यात माझा मित्र गणेश दौंड येऊन मला म्हणाला की आज निकाल लागला आहे आणि तु यशस्वी झाला आहे.
खरंतर ही एवढी मोठी आनंदाची बातमी असताना देखील मी स्तब्ध झालो.माझ्या आई वडिलांना फोन करून कळवलं की मी पीएसआय झालो आहे.डोळ्यात अश्रू होते आनंदाचे,पण माझ्या मित्रांनो माझा हा प्रवास एक दोन दिवसाचा नाहीतर माझा हा प्रवास संघर्षाचा आहे.
मी म्हणेल स्वतःवर विश्वास ठेवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याने कुणी स्वतःवर विश्वास ठेवला तो प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात एक वेगळा इतिहास करून गेला आहे. आणि तो अनुभव मी माझ्या जीवनात देखील अनुभवला आहे खरं तर वास्तविक जीवनामध्ये परिश्रम हा महत्त्वाचा भाग आहे.वास्तविक परिस्थिती सांगताना मनाला खूप वाईट वाटतं परंतु या वास्तविक स्थितीतून विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल असे के बी सरांनी सांगितलं त्यामुळे मी या लेखाकडे वळालो.
शालेय जीवनातही मी एकदम शांत,संयमी स्वभावाचा होतो.मला घडविण्यासाठी माझ्या आईवडिलांचा संघर्ष खरंतर मी पाहिलेला आई-वडील रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करत होते त्या कष्टाला पाहून असं वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये काहीतरी यांच्यासाठी मी केल पाहिजे खरं तर माझे वडील माझे खरे आदर्श आहेत ज्यांना पाहून खूप काही शिकलो माझे वडील चोवीस तासात चार तास आराम करतात हे मी पाहिलेल तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी ही देखील पाच-साडेपाच तासच आराम करत व जास्त वेळ अभ्यासाला देत संपूर्ण अभ्यास केला त्या अभ्यासाचा फायदा मला माझ्या जीवनामध्ये झाला होता.
ते म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग असा येतो की तो सगळं जीवनच बदलून जातो पुढे माझ्या जीवनात तोच प्रकार झाला माझ्या शेजारच्या गावामध्ये एकदा माझं भांडण झालं.धुमेगाव नावाचं गाव माझ्या गावाजवळ आहे आणि त्या ठिकाणी माझं भांडण झालं त्या भांडणामुळे वडिलांना माझा खूप राग आला आणि वडिलांनी मला शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं सांगितलं खरं तर तेव्हापासून माझ्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात झाली माझे ग्रॅज्युएशन चकलांबा मध्येच झालेल आहे तसेंच प्राथमिक शिक्षण चकलांबा येथेच झालेल आहे आणि या सर्व शिक्षणाला पाहता ग्रामीण भाग असल्यामुळे खूप अडचणीची परिस्थिती होती आणि त्या अडचणीच्या परिस्थितीवर मात करून मला माझे स्वप्न पूर्ण करायचे होते.
स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात आल्या अनेक गोष्टींचा विचार चांगल्याप्रकारे करू लागलो आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना अनेक अनुभव आले.
ज्या व्यक्तीला वास्तविक परिस्थितीचे भान असते तो नक्कीच एमपीएससी सारख्या परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य खूप खडतर असतं. राहण्याची सोय ,जेवण ,पैसा ,गावाकडील परिस्थिती ,अपुरे शैक्षणिक बॅकग्राऊंड काही जणांच्या…. बाबतीत स्वतःवरील अविश्वास, नकारात्मकता ….अशा अनेक समस्या आहेत वरील प्रत्येक समस्य करिता माझ्याकडे मनाला टोचतील डोळ्यात पाणी येईल अशी उदाहरणे आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी खेडेगावातून मुल आलेली असतात खरं तर पैशाची अडचण असल्यामुळे स्वतःचे होणारे हाल आणि बिकट परिस्थिती असल्यामुळे घरच्यांकडून पैसे मागता येत नाही. अशा अनेक समस्यांना तोंड देऊन अभ्यास करणं खरं तर खूप मोठी समस्या आहे परंतु तरीही देखील मुलं अभ्यासासाठी सजग असतात. एक छोटेसे उदाहरण याठिकाणी लिहावसं वाटतं,काही वर्षांपूर्वी एक मित्र पुणे या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात आला होता कदाचित तो प्रथमच पुण्यासारख्या शहरात आला असेल शहराच्या भव्यते तो एका मुंगी प्रमाणे त्याला काय करावे सुचत नव्हते व त्यात वरून पाऊस सुरू झाला होता. सोबत काही पुस्तके व कपडे यांचे ओझे होते कदाचित खिसे भरलेले असते तर त्याला त्या सामानाचे ओझे वाटले नसते अशा वेळी या मोठ्या शहरात त्याला कोण ओळखणार सिटी बस मधून उतरून तो एक एक पाऊल चालत एका मंदिराजवळ जाऊन थांबला आणि मंदिरा जवळ जाऊन आपले बॅक कपडे ठेवून सुमारे दोन ते तीन दिवस तो रूम शोधत होता. खिशातले पैसे रूमसाठी लागतील म्हणून खूप जपून जपून वापरत होता अशाच एका शनिवारी खायला पैसे नाहीत पोटात प्रचंड भूक लागलेली त्यावेळी पुण्याच्या शनिवार चौकात दर शनिवारी प्रत्येक दुकानासमोर नारळ फोडूनदुकानावर ठेवलं जायचं तो नारळ खाऊन त्यांन शनिवारचा दिवस काढला होता.त्यानंतर काही दिवसांनी तो मुलगा त्या वातावरणामध्ये रूळू लागला आणि नंतर स्वतःच्या स्वप्नांसाठी झटू लागला, जिद्दीने अभ्यास करू लागला ,आणि माझ्या मित्रांनो एक दिवस आला त्यांन त्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं.अशा प्रकारची जिद्द जर आपल्या मनामध्ये देखील असेल तर नक्कीच तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे.स्पर्धा परीक्षा करणारी मुले शक्यतो ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली मुलं असतात त्यांना घरून पॉकेटमनी देखील कमी मिळतो आणि त्यात पॉकेटमनी मध्ये त्यांचं भागात नसतं तरीही सुद्धा प्रयत्नांची पराकाष्टा करून स्वतःच्या आयुष्याला यशस्वी करणार्या प्रत्येक युवकाला मी या लेखाच्या माध्यमातून सलाम करतो.
तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्वतःला मजबूत बनवावे लागेल त्याशिवाय पर्याय नाही.माझ्यावरती अनेकांचा अविश्वास होता परंतु माझी आई मला नेहमी म्हणायची की पवन तू नक्कीच यशस्वी होणार माझ्या आईचा तो शब्द माझ्या जीवनासाठी खरोखर खरा ठरला.
माझ्या घरा मध्ये शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, माझे चुलते तेवढे पोलीस कॉन्स्टेबल होते.
मलादेखील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अडचणी आल्या परंतु मी त्या अडचणीचा मी कधी विचार केला नाही ,अभ्यास करत राहिलो यामुळे पहिल्याच प्रयत्नांमध्ये मला यश मिळाले.
या यशाचं क्रेडिट खरं तर माझ्या आई-बाबांना जातं त्यानंतर मला मदत करणाऱ्या माझ्या शिक्षकांना जातं त्याचबरोबर माझ्या त्या सर्व मित्रांना जातात ज्यांनी मला यासाठी मदत केली आहे.
माझा निकाल म्हणजे माझ्या आई वडिलांसाठी ,माझ्या गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राष्ट्रासाठी खरं तर सोन्याचा दिवस होता सर्वांना निकाल माहित झाल्यानंतर गावांमध्ये अनेक जणांनी फटाक्यांची आतिषबाजी केली होती. अनेकांनी माझ्या आई-बाबांचा सत्कार केला होता.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात तुम्ही हुशार किती आहात यापेक्षा महत्व तुम्ही जिद्दी मेहनती किती आहात याला आहे. हुशार असतानाही दिशा भरकटली तर तुमच्या हुशारीला किंमत नाही.मला आदरणीय के बि शेख सरांनी फोन वरून माझ्या जीवन प्रवासा वर प्रकाश टाकण्यास सांगितले व त्यावरून मी लेखणी हातात घेतली . त्यांनी मला या मा ध्यमातून एक मंच उपलब्ध करून दिला त्यावरून वाचकांना एवढेच सांगू इच्छितो की सकारात्मकता ,नम्रता ,संयम ,स्वतःवरील विश्वास, अव्यसनाधीनता या गोष्टी आपल्याला खूप काही मिळवून देतात जगात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे,,,,,,, काही प्रश्नांची उत्तरे वेळेवर, तर ………काहींची अवेळी मिळतात त्यामुळे प्रत्येक वेळी धास्तावून घाबरून न जाता संयम व सकारात्मकतेने चालना महत्त्वाचे आहे तसेच स्पर्धा परीक्षेचा आहे या क्षेत्रातही संयम, सकारात्मकता ,नम्रता, अव्यसनाधिनता, स्वतःवर विश्वास यांची अत्यंत गरज आहे यांना धरून चालल्यास यश नक्कीच मिळते.
नोकरी लागल्यानंतर चा आनंद काही औरच असतो हा आनंद शब्दात लिहून सांगता येणार नाही हा स्वतः अनुभवावा लागतो माझी अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक परीक्षार्थी या क्षणाचा आनंद नक्कीच घेईल स्पर्धापरीक्षा करणाऱ्या सर्व मित्रांना माझ्या खुप सार्या शुभेच्छा,
शेवटी एक सांगावसं वाटतंमला कि,
केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे.
` @Pawan nimbalkar (psi)