December 12, 2024 9:29 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » तुमची आहे तूळ रास? ऑगस्ट महिना आहे खास, ‘या’ तारखांना होतील मोठी कामं

तुमची आहे तूळ रास? ऑगस्ट महिना आहे खास, ‘या’ तारखांना होतील मोठी कामं

Facebook
Twitter
WhatsApp

कोल्हापूर 28 जुलै :  आपल्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते.  पुढच्या महिनाभरात आपल्या आयुष्यात काय चांगलं वाईट घडणार आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याप्रमाणे आपण आपल्या हातून होणाऱ्या चुका सांगू शकतो. बारा राशींपैकी तुला अर्थात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशिभविष्यात ऑगस्ट महिन्याबाबतीत काय सांगितले आहे, याची माहिती कोल्हापूरच्या अरविंद वेदांते गुरुजींनी दिली आहे. कसा असेल ऑगस्ट? वेदांते गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑगस्ट महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. त्यांना शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. त्यांचे जुने बिघडलेले नाते सुधारु शकते तसेच व्यावसायिक संबंधही दृढ होण्याचा अंदाज आहे.’

News18लोकमत


News18लोकमत

अशी असेल ग्रहांची स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू, मंगळ, बुध गुरु, शुक्र आणि नेपच्युन हे ग्रह प्रगतीपथावर आहेत. मात्र केतू या राशीसाठी अनिष्ट आहे. या व्यक्तींना ऑगस्ट महिन्यातील अधिक श्रावण महिन्यात चांगले ग्रहमान आहे. ऑगस्टमधील निम्मा महिना हा अधिक महिन्यात तर उर्वरित श्रावण महिन्यात येतो.  तुळ राशीच्या व्यक्तींच्या सांसारिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. विद्यार्थी वर्गाची अभ्यासातील प्रगती वाढेल. महिलांमध्ये समाजकार्यांची गोडी वाढेल. ज्या लोकांची शेती किंवा बागायत आहे त्यांचीही प्रगती होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना फायदेशीर असेल,’ असं वेदांते गुरुजी यांनी सांगितलं.
तुमच्या मुलाचं अभ्यासात नाही लागत लक्ष? ‘हे’ रत्न घातले तर होईल फायदा
कोणते दिवस शुभ? ‘ऑगस्ट महिन्यामध्ये 5, 6, 14 आणि 15 तारखेला तुळ राशीच्या व्यक्तींचे ग्रह बलवान आहेत. म्या दिवशी एखाद्या कर्मचाऱ्याची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी बढती मिळणेही संभव आहे. या दिवशी नवीन लोकांशी तुळ राशीच्या व्यक्तींचा संबंध वाढेल. महिला वर्गाला समाजकार्याची ओढ त्यांना प्रगतीपथावर घेऊन जाईल. एकंदरीत या तारखांचा विचार करता तुळ राशीच्या व्यक्ती अधिक श्रावण महिन्यात चांगली प्रगती होईल,’ असं वेदांते गुरुजींनी सांगितले आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें