डोंबिवली, 29 जुलै : नवा महिना कसा जाणार? आपल्या इच्छा पूर्ण होणार का? रेंगाळलेली कामं मार्गी लागणार का? कोणतं नवं विघ्य येणार नाही ना? याची उत्सुकता आणि काळजी सर्वांनाच असते. मेष राषीच्या लोकांना आगामी ऑगस्ट महिना कसा जाणार आहे? याची माहिती
डोंबिवलीतील
ज्योतिषी प्रवीण गोरे यांनी दिलीय. कसा असेल ऑगस्ट? मेष ही मंगळाची रास आहे. या राशीच्या व्यक्ती कोणतीही गोष्ट विचार न करता करुन मोकळी होते. ज्या गोष्टी करायला भीती वाटते तीच गोष्ट यंदा करा. तुम्हाला यश प्राप्ती होईल. तुमच्यासाठी हा महिना उत्साहवर्धक आणि अनुकूल आहे, असं भविष्य गोरे यांनी सांगितलंय.
News18लोकमत
कोणते दिवस चांगले? या महिन्यात 7 ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश करत आहे. नोकरीत नवी संधी उपलब्ध होईल. दुर्लक्ष करू नका. व्यापार धंद्यात अर्थप्राप्ती होईल. पती पत्नी मध्ये गैरसमज निर्माण होतील. मात्र त्यावर तोडगाही निघेल. जागेचे व्यवहार आणि वाहन खरेदीचा योग आहे. 17 ऑगस्ट नंतर मनावरील दडपण कमी होईल. तरुणांनी शरीराकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला गोरे यांनी दिला. ऑगस्ट महिन्यात 1, 2,3,12, 19, 20, 28, आणि 31 हे दिवस शुभ आहेत. तर 5, 6, 14, 15, 24, 25 या तारखांना महत्त्वाची कामं करू नका, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
तुमची आहे तूळ रास? ऑगस्ट महिना आहे खास, ‘या’ तारखांना होतील मोठी कामं
सध्या अधिक महिना सुरु असून या महिन्यात अनेक ग्रहांची युती होणार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट शांतपणे विचार करुन कराव्यात. मेष राशीसाठी हा महिना मिश्र फळ देईल, असं गोरे यांनी स्पष्ट केलं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.