प्रतिनिधी नाजीम शेख
पैठण तालुक्यातील सोलनापूर या ठिकाणी टाफे जे फार्म सर्विसेस व तमन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2024 जागतिक पर्यावरण दिन अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन संजय अहिरवार (महाराष्ट्र स्टेट हेड टाफे सी.एस.आर) व ज्ञानेश्वर वच्छे कंपनी प्रतिनिधी तसेच तमन्ना फाउंडेशनचे सचिव के.बी शेख यांच्या वतीने करण्यात आले. झाडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे अशाच प्रकारे वृक्षतोड वाढत गेली तर येणारी वेळ ही फार भयानक असेल असे यावेळी कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वच्छे यांनी बोलताना सांगितले. यावेळी सरपंच शकुंतला सातपुते व ग्रामसेवक रजनीकांत पोकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपसरपंच, रोजगार सेवक, तसेच गावातील तरुण वर्ग या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.