दहावीत दहा वेळा नापास सोमवारी २७ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला,यात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक झाले,अशातच एक विद्यार्थी फक्त दहावी उत्तीर्ण झाला म्हणून गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली,कारण त्याच्या पास होण्याला सुद्धा विशेष महत्त्व होते.
बीड जिल्ह्यातील परळी मधील कृष्णा नारायण मुंडे हा विद्यार्थी या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला,त्याने या वर्षी अकराव्या प्रयत्नात या यशाला गवसणी घातली आहे म्हणून गावकऱ्यांनी त्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे.
कृष्णा २०१८ मध्ये दहावी च्या वर्गात शिकत होता, पहिल्या वर्षी तो नापास झाला, वडील अशिक्षित असल्याने आपल्या मुलाने शिकाव ही त्यांची इच्छा, त्यांनी कृष्णा ला पुन्हा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले, कृष्णा ने देखील पुन्हा परिक्षा दिली पण तो पुन्हा नापास झाला,हे चक्र २०२४ पर्यंत सुरू होते, या कालावधीत कृष्णा ने दहा वेळा दहावीची परीक्षा दिली,
वडील नारायण मुंडे हे गंवड्याच्या हाताखाली मजुरी करून कृष्णा ला परिक्षेसाठी, पुस्तकांसाठी पैसे पुरवत होते, कृष्णा देखील त्यांच्या सोबत मजुरीच्या कामावर जाई,पण पोराने शिकाव म्हणून त्यांनी मागे पुढे पाहिले नाही, वारंवार परिक्षा देण्यासाठी कृष्णा कडे आग्रह धरला, अखेर अकराव्या प्रयत्नात कृष्णा या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला, कृष्णा च्या या यशाचे , त्याच्या व त्याच्या वडिलांच्या जिद्दीचे कौतुक होत असून, कृष्णा च्या या यशासाठी गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली आहे,बीड जिल्ह्यातील कृष्णा व त्याचे वडील श्री नारायण मुंडे हे सध्या राज्यभर चर्चिले जात आहेत. प्रसार माध्यमांनी सुद्धा या बाप लेकाच्या जिद्दीची दखल घेतली असून,प्रसार माध्यमांशी बोलताना कृष्णा चे वडिल श्री नारायण मुंडे हे भाऊक झाले होते,”मला शिकायला मिळाले नाही म्हणून माझ्या पोराने शिकाव ही माझी तळमळ आहे,त्यानी पुढं देखील शिकाव,मी काबाडकष्ट करून त्याला पैसे पुरवील”असे श्री नारायण मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.