December 13, 2024 3:01 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » रंगधर्म » मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा!- बाळासाहेब गोरे( संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)

मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा!- बाळासाहेब गोरे( संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)

Facebook
Twitter
WhatsApp

मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा!- बाळासाहेब गोरे( संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)


जनहित प्रतिनिधी-, “अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ” सन 2019 ला स्थापन झाल, का? तर मराठी चित्रपट निर्मात्याचं कोणीच ऐकून घेण्यास तयार नाही. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये निर्मात्यांच्या किमान चार पाच संघटना! साऊथ तर शक्तिमान. परंतु, मराठी चित्रपट निर्मात्यांची परिस्थिती तर फार बिकट, जो निर्माता आपली जमीन, घरदार, सोनं नाणे गहाण ठेवून मराठी चित्रपट निर्मिती करतो. निर्माते यांना माहित आहे चित्रपटास चित्रपटगृहात प्रेक्षकांचा अल्पश: प्रतिसाद आहे. तरीही मराठी सांस्कृतिक संस्कृतीवर असणारी निष्ठा, प्रेम, त्याचा मराठी बाणा आणि कणा त्याला आपल्या मातृभाषेचे मराठीपण जपायची ऊर्जा देते. बदल्यात निर्मात्यांना काय मिळते ? अमराठी कार्पोरेट कंम्पन्याच्या मालकाकडून निर्मात्यांचा पान उतारा होतो तो निमूटपणे सहन करावा लागतो ! निर्माता लाखो – कोटी रुपये खर्च करून शेकडो लोकांच युनिट सांभाळतो, एका अर्थाने एका चित्रपटामुळे निर्मिती ते थिएटर रिलीज पर्यंत दोनशे कुटूंबांचा उदरनिर्वाह होत असतो.
पण चित्रपटाची काही दलाल मंडळी एक लाखापासून किंमत करतात. मराठी चॅनेलसनी तर गेली दोन ते तीन वर्षापासुन चित्रपटाचे हक्क विकत घेणेच थांबिवले आहे. फक्त दलाली घेऊन दलाला मार्फतच एक दोन चित्रपट घेतले जातात. बाकीचे चांगले चित्रपट त्यांना एक ते पाच लाखात म्हणजे फुकटच पाहिजे असतात. त्यात कहर म्हणजे एकेकाळी चित्रपट रिलीज करण्याकरिता वितरक निर्मात्याला एक ठराविक रक्कम देऊन चित्रपट रिलीज करायचा, आता तोच निर्मात्याकडून पाच लाखाची दलाली घेतो असे का? ज्या चिटपट गृहात चित्रपट प्रदर्शीत होत होता तो थिएटर मालक स्वत: आजूबाजूच्या परिसरात जाहिरात करत होता. वर्तमान पत्रात आपल्या थिएटर ची जाहिरात देत होता. आता हा सर्व खर्च निर्मात्यांवर टाकला जातो मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची मनमानी वाढली आहे हे अन्याय कारक आहे या विषयी निर्माता महामंडळ आक्रमक आहे. निर्मात्यांना त्यांचे हक्क व सन्मान मिळालाच पाहिजे. त्या करिता सरकारनी मराठी चित्रपट निर्मात्यांना सरसकट अनुदान देऊन स्वत: पासून सुरुवात केली पाहिजे. तसेच हजारो कुटूंबाची उदरनिर्वाह करणाऱ्या मराठी चित्रपट निर्माता यांचे चित्रपट *अनुदानास अपात्र* ठरवतात. करोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान निर्माता यांचे झाले आहे त्यामुळे 2020 पासून *अनुदान अपात्र* चित्रपटांना *सरसकट अनुदान* देऊन पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती करीता प्रोत्साहन द्यावे.
तसेच कलाकारांचे हक्क मिळवण्याकरिता महाराष्ट्रातील तमाम मराठी चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार, कामगार येत्या 30 एप्रिल 2024 रोजी भारतीय चित्रपट सृष्टींचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त हिंदमाता चौक, दादर (पूर्व ) येथील मा . दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 9.00 वाजता मोठ्या संख्येने जमणार आहेत आणि ठिय्या आंदोलन करून सरकारला सरसकट अनुदान देण्याकरिता भाग पाडणार आहे. आम्ही येतोय, तुम्ही पण या! मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा सक्षम करूया! असे आवाहन बाळासाहेब गोरे देवेंद्र मोरे , मेघा डोळस व सर्व सदस्य यांनी केले आहे

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें