December 13, 2024 2:23 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कालव्यात पडून मृत्यू

पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कालव्यात पडून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp

पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कालव्यात पडून मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी: जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कांबी ता शेवगाव येथे पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर हकीगत असी की,हातगाव येथील अण्णा गायकवाड (वय अंदाजे 22) हा युवक काल दिनांक 20 रोजी शेत मजुरीच्या कामासाठी शेजारच्या कांबी गावात गेला होता‌.दुपारी दोन च्या सुमारास जवळून वाहत असलेल्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर पाणी पिण्यासाठी गेला असता,पाय घसरून पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला, सोबतच्या मजुरांना माहिती मिळताच त्यांनी अण्णा गायकवाड ची शोधाशोध केली परंतु अण्णा चा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच हातगाव सह कांबी मधील ग्रामस्थांनी अण्णा गायकवाड साठी शोधमोहीम राबवली परंतु दुर्दैवाने आज दिनांक 21 रोजी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान मालेगाव परिसरात अण्णा गायकवाड चा मृतदेह आढळून आला.सदरील घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे श्री नानासाहेब गर्जे साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित झाले आणि सदरील मृतदेह पोस्ट मार्टम साठी शेवगाव येथे पाठविण्यात आला आहे.
मयत अण्णा गायकवाड यांच्या पाठीमागे पत्नी, तीन महिन्याची एक मुलगी व दोन वर्षे वयाचा एक मुलगा असून अण्णा व त्याची पत्नी शेतमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे कॉंक्रेटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी कॉंक्रेटीकरणा साठीचा प्लॅस्टिक पेपर चे आच्छादन केलेले होते,त्या प्लॅस्टिक पेपर मुळेच पाय घसरून अण्णा गायकवाड कॅनल मध्ये पडले व त्यात त्यांचा मृत्यू झाला, संबंधित ठेकेदाराने सुरक्षे विषयी काळजी न घेतल्याने आमचा माणुस जिवाला मुकला असल्याचा आरोप अण्णा गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हातगाव चे सरपंच श्री अरुण भाऊ मातंग यांनी देखील सदरील हकीकत शेवगाव चे तहसीलदार श्री सांगडे साहेब यांना दिली असून हे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील कुटूंब असून या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे हातगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें