विहामांडवा प्रतिनिधी/इम्तीयाज शेख
पैठण तालुक्यातील नवगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैठण व नवगाव नागरी सहकारी पतसंस्था व गुलदाद पठाण मित्र मंडळातर्फ नाथषष्ठीनिमित्त पैठणकडे रवाना होणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता पाण्याची व्यवस्था केली आहे.तसेच नवगाव ग्रामपंचायतीच्या वतीनेसुद्धा नवगाव बस स्टॉपवर वारकऱ्यांना चहा, पाण्याची व्यवस्था केली होती.
नवगाव येथील अनेक स्वयंसेवकांसह मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यामध्ये उपवास असतानाही दिंड्यांमधील वारकऱ्यांना चहा पाण्याची, नाश्त्याचे नियोजन केले.
यावेळी नवगाव पार्क बसस्टँड येथे नवगाव नागरी सहकारी पतसंस्थाचे कार्यालय समोर राष्ट्रवादी कांग्रेस चे तालुकाध्यक्ष तथा बँकेचे चेअरमन डॉ गुलदाद पठाण, व्हाइस चेअरमण श भिमराव धनावडे, हाजी यासीन भाई, डॉ अर्शद पठाण,कल्याण चौधरी, बबलू सेठ, निवेश भावले, अनंता लाड, ग्रामविकास अधिकारी मंचक भोसले साहेब,लहू पाटील चौधरी मॅनेजर योगेश डांगरे, कॅशियर वसीम पठाण, असीफ पठाण, असीम पठाण,सोहेल पठाण, सोसायटीचे व्हईस चेअरमन आसेफ पठाण, काकासाहेब भावले, कडु गवळी आदी भाविक व गावकरी उपस्थित होते.मुस्लिम समाजाच्या युवकांनी पुढाकार घेऊन चोख व्यवस्था ठेवल्याने डॉ गुलदाद पठाण, नवगाव बँक यांचे भाविकांनी कौतुक करून आशीर्वाद दिला.