शाळेत जाऊन केला 430 शिक्षिकांचा मान सन्मान
विहामांडवा/इम्तीयाज शेख
जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिलेदारांनी पैठण तालुक्यातील 18 केंद्रातील शाळेवर थेट जात भेटवस्तू देऊन 430 शिक्षिकांचा सन्मान केला.
या वेळी या महिलांच्या कार्याचा आपण शिकवत असलेल्या शाळेतच भेटवस्तू देऊन सन्माण,गौरव केल्याबद्दल शिक्षिका भगीनी प्रभावी होत भारावून गेल्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आमच्या कार्याला दिलेली ही पावती असून अशा प्रकारच्या पाठबळामुळे उर्जा मिळुन अधिकचे काम करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आपल्या चांगल्या कार्याच्या माध्यमातून अविरत कार्यमग्न असल्याने शिक्षक संघाचा विचार अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे प्रतिपादनासह उत्स्फूर्त प्रतिक्रिया या वेळी महिला शिक्षकांनी व्यक्त केल्या.
मा.जि.प.निमंत्रित सदस्य- बळीराम भुमरे,जिल्हा नेते-संतोष थोरात,राजेंद्र डुकरे,संचालक- शमिम पठाण,श्रीराम घोलप, महादेव बिनवडे,अनिलअहिरराव, तालुका नेते-रामनाथ मोहिते, किशोर झोटे,तुळशीराम मिसाळ, तालुकाध्यक्ष-योगेश शिसोदे, सरचिटणीस-समशेर पठाण, कार्याध्यक्ष-नारायण बहिर, कोषाध्यक्ष-राजेश खिल्लारे, सहकार्याध्यक्ष-जयसिंग खेडकर, तालुका संपर्क प्रमुख-मयुर शिसोदे,शहर प्रमुख-अहेमद शेख,उपाध्यक्ष-बाबासाहेब बडे, भागवत फुंदे,कैलास गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख-आरुण राठोड, तालुका संघटक-राहुल तांदळे,व धोंडिराम सुखदेव,जहांगीर रोजेवाले,दिगंबर केदार,यांनी घेतला पुढाकार.