भगवाननगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
उत्साहात संपन्न
जनहित मराठी पाथर्डी प्रतिनिधी- (बाळासाहेब कोठुळे)
विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारात पालक झाले दंग
गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक भगवाननगर ( वरखेड ) शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राजेश कदम ( गट विकास अधिकारी शेवगाव ), कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडेकर ( विस्तार अधिकारी शिक्षण ), प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण साहेब, श्री सचिन भाकरे ( विस्तार अधिकारी), आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेची गुणवत्ता व शाळेत राबवले जात असणारे उपक्रम पाहता शाळेची पटसंख्या पुढील काही दिवसांमध्ये पन्नासच्या वर जाईल असा विश्वास यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम साहेब यांनी बोलून दाखवला. शाळेत चालू असलेला पाढ्यांचा उपक्रम आणि इंग्रजी संवाद या संदर्भात त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शाळेसाठी भौतिक सुविधा अंतर्गत बोरवेलमध्ये मोटार, शौचालय प्लंबिंग आणि सोलर असे एक लाख रुपये इस्टिमेट असणारे कामकाज पुढील दोन-तीन महिन्यात पूर्ण करून देणार असल्याचे राजेश कदम यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांचे नाट्य कलागुण, नृत्य पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.
प्रत्येक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणारी आदर्श शाळा म्हणून डॉ. शंकर गाडेकर यांनी भगवाननगर शाळेचा उल्लेख केला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी पुढे उल्लेख केला की, बालपणी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही खरंतर त्यांच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. आणि जीवनामध्ये मिळालेली एक संधी संपूर्ण जीवन बदलून टाकते. म्हणून बालपणीच विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळायला हवी, आणि ती संधी या शाळेत मिळते आहे. याचे समाधान व्यक्त केले.
40 ते 45 कुटुंब असणारी लोकवस्ती परंतु 64,600 इतका मोठा लोकसहभाग पाहून सर्व अधिकारी आणि पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केले.
याप्रसंगी श्री.महादेव जावळे ( उद्योजक गुजराथ )शेवगाव तालुक्यातून शिक्षक, अधिकारी, लेखक, कवी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर राजाराम तेलोरे, गावचे सरपंच उषाताई परमेश्वर तेलोरे, उपसरपंच विकास शिरसाठ, श्री. हनुमान पातकळ ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ), राजाराम तेलोरे साहेब, श्रीम. शितल व्यवहारे ( ग्रामसेविका वरखेड ),आदर्श शिक्षक जयराम देवढे, लक्ष्मण झिंजुर्के, ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे, आत्माराम शेवाळे, अल्ताफ बागवान, विष्णू वाघमारे, सविता ढाकणे, अश्विनी कांबळे, ग्रामपंचायत सर्व सदस्य वरखेड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन मुख्याध्यापक श्री निलेश दिलीपराव दौंड व सहशिक्षक पद्माकर पंढरीनाथ खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व स्नेहसंमेलन आयोजक टीमने यशस्वीपणे पार पाडले. या दिमागदार सोहळ्याचे सूत्रसंचालन कवयित्री पूनम राऊत यांनी केले तर आभार निलेश दौंड यांनी मानले.