झाडूने आणि वाणीने गावाची व मनाची स्वच्छता करणारे कृतीशील राष्ट्रसंत गाडगे बाबा आता कृतीतून आचरणात आणले पाहिजेत: विष्णू गायकवा
जनहित मराठी प्रतिनिधी: बाळासाहेब कोठुळे पाथर्डी
समाजात सुख शांतिसाठी विवेकाचे आणि नीतीचे आचरण करणारी मानसं गरजेची असतात ती निर्माण करण्याचं काम नऊसे वर्षा पूर्वी संत ज्ञानेश्वर,तिनसे वर्षा पूर्वी संत तुकाराम,दिडसे वर्षा पूर्वी संत गाडगेबाबा यांनी केले.
आणि आज महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानसा-मानसामधे असणारा संभ्रम दूर करून दिशाहीन समाजाला चांगली वाट दाखवण्याचे काम करत आहे.फक्त आज गरज आहे ती आपल्या सारख्या तरुणांची सर्व मुला-मुलींनी या चळवळीमध्ये सामिल होऊन कर्मकांडात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी सहभाग आणि सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अहमदनगर शहर विष्णू गायकवाड यांनी केले.
श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता.पाथर्डी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथ नगर,*राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात पाचवे पुष्प गुंफताना विष्णू गायकवाड बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी दत्तात्रय वाळके, उद्योजक तिसगाव हे होते यावेळी गायकवाड यांनी पैसे गायब करणे, केसातून भस्म करणे, मनशक्ती तसेच जिभेमधे त्रिशूळ घालणे असे विविध चमत्काराचे प्रात्यक्षिक दाखवून त्यातील फोलपणा उरगडून सांगितला.हा आगळावेगळा कार्यक्रम पाहून विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी भारावून गेले. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थी प्रतिनिधी तेलोरे वैष्णवी यांनी मांडली तर सुत्रसंचलन निकम अजय यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.आसाराम देसाई, डॉ.साधना म्हस्के,प्रा.अस्लम शेख,प्रा.योगिता इंगळे तसेच प्रथमेश पगारे,तेजेश गायकवाड, शिवाजी बर्डे, आकाश बर्डे आदींनी परिश्रम घेतले.