जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बूटे
विविध सामाजिक उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
शेवगाव तालुक्यातील( हातगाव) लक्ष्मी चांदगाव येथे 19 फेब्रुवारी रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक करून प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले अहमदनगर ब्लड बँक अधिकारी रामनाथ शेळके यांच्या वतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी हाडांचे विकार असे शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 30 युवकांनी रक्तदान केले. दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये श्री ज्ञानाआई मुलींची वारकरी सांप्रदाय संस्था आळंदी येथील जवळपास 70 मुलींच्या ग्रुप च्या माध्यमातून टाळ मृदंग व अभंगाच्या तालावरती छत्रपती शिवरायांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली सहा ते आठ या वेळेमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ठीक आठ वाजता (बालकीर्तनकार) ह.भ.प श्वेता बडे याचे कीर्तन झाले. छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणे आणि मानवतावादी विचार ठेवणे ही काळाची गरज आहे. असे कीर्तनातून श्वेता बडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवछत्रपती तरुण मंडळ व लक्ष्मी चांदगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते