शेवगाव प्रतिनिधी: अविनाश बुटे
पिंगेवाडीत उज्वला गॅस योजना शिबीराचे आयोजन महिलांसाठी संजीवनी ठरत असलेली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ पिंगेवाडी येथील गॅस पासून वंचित असलेल्या महिलांसाठी पिंगेवाडी येथे प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत मुंगादेवी एच. पी. गॅस दुर्गम क्षेत्रीय वितरक मुंगी यांच्या माध्यमातून तसेच सावली दिव्यांग संघटनेच्या प्रयत्नांने महिलांना नवीन गॅस कनेक्शन करिता पिंगेवाडी येथे दिनांक 17 फेब्रूवारी 2024 रोजी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये 25 महिलांचे प्रधानमंत्री उज्वला गॅस करिता रजिस्ट्रेशन करण्यात आले. उर्वरित महिलांसाठी पुन्हा एकदा शिबीर आयोजित करण्यात येईल असे हरिभाऊ रकटे यांनी सांगितले. शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख, पिंगेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक जायभाये, भागवताचार्य ह भ प अनिल महाराज मुंढे,नारायण बाळासाहेब मुंढे, मुंगादेवी गॅस एजन्सीचे मालक हरिभाऊ रकटे, ऑपरेटर राहुल सरोदे, सोपान रकटे यांनी परीश्रम घेतले. यावेळी रावसाहेब तानवडे,आंनदा शेलार, नितीन अंगरख,रावसाहेब मुंढे, इसाक शेख,अशोक तानवडे,सोमनाथ क्षीरसागर, संतोष तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश अंगरख, सुदामती मुंढे, शोभा तानवडे, किसनाबाई घुले,शोभा दगडखैर,जयश्री घुले, नंदाबाई घुले, नगीना शेख, रुबीना शेख,पार्वतीबाई तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलां बघिणी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शन मिळत असल्याने पिंगेवाडी येथील महिलांनी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांचे आभार मानले. शंभर रुपयात गॅस मिळत असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. पिंगेवाडीत गॅस शिबीर आयोजित केल्याबद्दल महिलांनी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना महिलांना वरदान ठरत असल्याचे सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख म्हणाले.