पैठण प्रतिनिधी: जनहित मराठी न्यूज नेटवर्क
दि 9 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पैठण पाचोड या मार्गावरून लोखंडी पाईप ने भरलेला आयशर ट्रक क्रमांक MH16CD4709 पुण्याकडून मध्य प्रदेश बालाघाट या ठिकाणी वाहतुकीसाठी जात होता. हा ट्रक लिंबोडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील सोमीनाथ अंबादास घुगे यांच्या नावावर आहे व ते स्वतःच याला चालवत होते. आखतवाडा फाट्या जवळ पाचोड कडे जाणाऱ्या मार्गावर पुलाजवळ अपघाती वळण आहे. या वळणावर ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे वाहन पलटी झाले. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
ड्रायव्हरला किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अगोदरही त्या वळणावरती बरेच एक्सीडेंट झालेले आहेत.
प्रतिक्रिया
वळणावर गाडीचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला.कालपासून गाडीचा अपघात झाला आहे परंतु चोलामंडलम या कंपनीचे इन्शुरन्स असताना देखील कंपनीचा एकही अधिकारी गाडीची पाहणी करण्याकरिता आला नाही.चोलामंडलम हे इन्शुरन्स कंपनी जनसामान्यांसोबत फसवणूक करत आहे.
सोमीनाथ अंबादास घुगे
(आयशरट्रक मालक चालक)