पैठण प्रतिनिधी: जनहित मराठी
भाषा,साहित्य,संस्कृती व संशोधन परिषद व मराठी विभाग, ताराई कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण शाखा उद्घाटन व निमंत्रितांचे कवीसंमेलन दि. 10 फेब्रुवारी2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यामध्ये निमंत्रित कवी म्हणून,नारायण खरात,अब्दुल हकीम,अयुब शेख, महेश मगर, पुनम राऊत, सरिता भांड/खराद, रवींद्र गायकवाड,ॲड.दानियल ताकवाले, धनराज भुमरे,राहेल घोडके, वसंत अभंग,विशाखा पाटेकर, गायत्री ठाकूर,सुचित्रा राऊत, रामदास घोडके, ईश्वर अडसूळ, ॲड. गणेश शिंदे या मान्यवर कवींचा सहभाग आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.रंजना पाटीदार व जनहित मराठीचे वृत्त संपादक सचिन अभंग व डॉ.गजानन जाधव हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. संतोष तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख मार्गदर्शक भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद चे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जीगे हे असणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष चव्हाण हे असणार आहेत. कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रामचंद्र झाडे हे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन ताराई विज्ञान व कला महाविद्यालय व भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.
Home
»
मराठवाडा स्पेशल
»
उद्या भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषदचे तालुका शाखेचे उद्घाटन व निमंत्रितांचे कवी संमेलन ताराई महाविद्यालय येथे
उद्या भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषदचे तालुका शाखेचे उद्घाटन व निमंत्रितांचे कवी संमेलन ताराई महाविद्यालय येथे
Facebook
Twitter
WhatsApp