अहमदनगर प्रतिनिधी जनहित मराठी न्यूज़ रिपोर्ट
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईकडे निघाला आहे.
आरक्षणाचा लढा खूप मजबूत पद्धतीने उभारण्यात आला आहे. मनोज पाटील जरांगे यांनी शासनाला दिलेल्या वेळ व तारखा संपल्या आहेत. आता ते नियोजित ठरल्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करनार आहेत.
कुटुंबासहित मराठा समाजातील तरुण-तरुणी वयस्कर मंडळी तसेच मोठ्या संख्येने महिला व लहान बालके देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
‘माझा जीव जरी गेला तरी हा लढा थांबवू नका’ असा उपदेश मनोज पाटील जरांगे यांनी मराठा समाजाला केला आहे.
आरक्षण नसल्यामुळे आमच्या लेकरांचे खूप वाईट दिवस आले आहेत आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही.ही आमची न्याय हक्काची लढाई आहे आणि ती आम्हाला सर्वांना सोबत मिळून लढायची आहे.
असे मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले,
आरक्षनाच्या लढ्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींची लाईन सुमारे 70 किलोमीटर पर्यंत झाली आहे.
मुंबईकडे एवढ्या मोठ्या संख्येने या अगोदर कोणताही समाज गेलेला नाही.या लढ्याला नक्कीच यश मिळणार असे दिसून येत आहे.